ठळक मुद्देBCCI नं व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा.
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble Birthday) याचा ५१ वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं (BCCI) अनिल कुंबळेच्या कसोटी सामन्यात १० विकेट्स घेतलेला एका जुना व्हिडीओ (Anil Kumbles 10 Wicket Haul) शेअर केला आहे. अनिल कुंबळेनं १९९९ मध्ये पाकिस्तान विरोधात दिल्ली येथील कसोटी सामन्यात हा विक्रम केला होता. कसोटी सामन्यात १० विकेट्स घेणारा दुसरा खेळाडू ठरला होता. यापूर्वी इग्लंडच्या जिम लेकर यांनी ऑस्ट्रेलियाविरोधात १९५६ मध्ये झालेल्या सामन्यात १० विकेट्स घेऊन हा विक्रम केला होता.
BCCI नं कुंबळेचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. "४०३ आंतरराष्ट्रीय सामने, ९५६ विकेट्स, कसोटी सामन्यात एका डावात १० विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज. टीम इंडियाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. पाकिस्तान विरोधातील त्यांच्या १० विकेट्स हॉल पुन्हा पाहूया," असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे.
अनिल कुंबळे सध्या आयपीएल (IPL) मध्ये पंजाब किंग्सचा हेड कोच म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. २०२१ चं आयपीएल त्यांच्यासाठी आणि त्यांच्या संघासाठी चांगलं ठरलं नाही. पंजाबचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय करू शकला नाही. कुंबळे यांच्या नेतृत्वाच टीम इंडियानं २०१६-१७ मध्ये पाच कसोटी सामन्यांच्या सीरिजमध्ये विजय मिळवला होता.
भारताला १७ कसोटी सामन्यांपैकी १२ सामन्यांत विजय मिळाला तर केवळ एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.