CPL 2025 Colin Munro Century : कॅरेबियन प्रीमियर लीग २०२५ च्या चौथ्या सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाकडून सलामीवीराच्या रुपात तगडी बॅटिंग करताना कॉलिन मुनरो याने विक्रमी शतक झळकावले आहे. न्यूझीलंडच्या ३८ वर्षीय बॅटरनं वादळी खेळी करताना ५७ चेंडूत १२० धावांची खेळी केली. १४ चौकार आणि ६ षटकारासह बहरलेल्या खेळीसह त्याने गिलच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारताना सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांच्या विक्रमाशी बरोबरी साधलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
Colin Munro ची खास विक्रमाला गवसणी, फक्त गेल पुढे
सेंट किट्सच्या बैसेटेरे येथील वॉर्नर पार्क स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात शाहरुखच्या सहमालकीच्या ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाकडून मैदानात उतरलेल्या कॉलिन मुनरो शतकी खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातली. CPL मध्ये शतक झळकवणारा तो दुसरा वयस्क खेळाडू ठरला आहे. ३८ वर्षे आणि १५९ वयात त्याने हा पराक्रम केला आहे. याबाबतीत फक्त ख्रिस गेल त्याच्या पुढे आहे. युनिवर्स बॉस ख्रिस गेलनं ३९ वर्,े आणि ३५४ दिवस वयात या लीगमध्ये शतक ठोकल्याचा रेकॉर्ड आहे.
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
कॉलिन मुनरो याने सूर्या-गिलची विक्रमाशीही केली बरोबरी
कॉलिन मुनरोनं सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स विरुद्धच्या शतकी खेळीसह दोन भारतीयांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. न्यूझीलंड बॅटरचं टी-२० क्रिकेटमधील हे सहावे शतक ठरले. सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल या दोघांनीही टी-२० क्रिकेटमध्ये ६ शतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे.
प्रतिस्पर्धी संघातून एकालाही जमली नाही मोठी खेळी, अन्...
कॉलिन मुनरोच्या दमदार शतकी खेळीशिवाय हेल्सनं २७ चेंडूत कुटलेल्या ४७ धावांच्या खेळीच्या जोरावर ट्रिबेगो नाइट रायडर्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २३१ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना सेंट किट्स संघाकडून एकालाही मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार जेसन होल्डरनं २२ चेंडूत केलेल्या ४४ धावांच्या खेळीशिवाय कायले मेयर्स ३२ (२२), आंद्रे फ्लेचर ४१ (२६) आणि रायली रॉसू ३८ (२४) धावांचे योगदान दिले. परिणामी त्यांना फक्त २१९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
Web Title: CPL 2025 Colin Munro Century Enters Chris Gayle Suryakumar Yadav Shubman Gill Club See Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.