CPL 2021 : एव्हिन लुईस, ख्रिस गेलच्या दमदार खेळीच्या जोरावर सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स फायनलमध्ये 

CPL 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वातील जेतेपदाची लढत ही सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts And Nevis Patriots ) व सेंट ल्युसीया किंग्स ( St Lucia Kings) यांच्यात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 11:47 AM2021-09-15T11:47:15+5:302021-09-15T11:48:22+5:30

whatsapp join usJoin us
CPL 2021: Evin Lewis, Chris Gayle Power St Kitts And Nevis Patriots To Final vs St Lucia Kings, Universe Boss goes past 2500 runs in CPL | CPL 2021 : एव्हिन लुईस, ख्रिस गेलच्या दमदार खेळीच्या जोरावर सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स फायनलमध्ये 

CPL 2021 : एव्हिन लुईस, ख्रिस गेलच्या दमदार खेळीच्या जोरावर सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स फायनलमध्ये 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CPL 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वातील जेतेपदाची लढत ही सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts And Nevis Patriots ) व सेंट ल्युसीया किंग्स ( St Lucia Kings) यांच्यात होणार आहे. आज हा अंतिम सामना रंगणार आहे आणि त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी खेळाडू दुबईत दाखल होतील. त्यांना दोन दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. उपांत्य फेरीच्या सामन्यात पॅट्रीओट्सच्या एव्हिन लुईस आणि युनिव्हर्स बॉस क्रिस गेल यांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. गेलनं या सामन्यात CPLमधील एक खास विक्रमही नोंदवला, तर लुईसच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सचा संघ आनंदात दिसला. 

 न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या ट्विटनंतर कॉलीन डी ग्रँडहोमला वाहिली जातेय श्रद्धांजली, जाणून घ्या कारण

गयाना वॉरियर्स आणि पॅट्रीओट्स यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वॉरियर्सनं ९ बाद १७८ धावा केल्या. शिमरोन हेटमयारनं २० चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४५ धावा करून वॉरियर्सच्या धावसंख्येत मोठा वाटा उचलला. ब्रेडन किंग्स ( २७), चंद्रपॉल हेमराज ( २७) व कर्णधार निकोलस पूरन ( २६) यांनी हातभार लावला. पॅट्रीओट्सला रोखण्यासाठी या धावा कमीच पडल्या. ख्रिस गेल व एव्हिन लुईस यांनी पहिल्या विकेट्ससाठी ७६ धावांची भागीदारी करून विजयाचा मजबूत पाया रचला. गेल २७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा करून माघारी परतला. या खेळीदरम्यान त्यानं CPLमध्ये २५०० धावांचा पल्लाही पार केला.

IPL 2021 : एबी डिव्हिलियर्सची ‘360 degree’ फलंदाजी; १७ चेंडूंत ८८ धावांची आतषबाजी!

 


त्यानंतर लुईस आणि कर्णधार ड्वेन ब्राव्हो यांनी सुसाट फटकेबाजी केली. ब्राव्हो ३४ धावांवर बाद झाल्यानंतर लुईसनं ३९ चेंडूंत ३ चौकार व ८ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहून संघाचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. आयपीएलमध्ये लुईस राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. बेन स्टोक्सच्या बदली RRनं त्याला करारबद्ध केले आहे. या सामन्यापूर्वी लुईसनं शतकी खेळीही केली होती.  

 

सेंट ल्युसिया किंग्सनं दुसऱ्या उपांत्य फेरीत त्रिनबागो नाइट रायडर्सवर २१ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. ल्युसिया किंग्सच्या ४ बाद २०५ धावांच्या प्रत्युत्तरात किरॉन पोलार्डचा रायडर्स १९.३ षटकांत १८४ धावांत तंबूत परतले. किंग्सकडून मार्क डेयाल ( ७८), रोस्टन चेस ( ३६),     डेव्हीड विसी ( ३४*) व टिम डेव्हीड ( ३८*) यांनी दमदार खेळ केला. डेव्हिड विसीनं गोलंदाजीत पाच विकेट्स घेताना रायडर्सला १८४ धावांवर गुंडाळले. 

 

Web Title: CPL 2021: Evin Lewis, Chris Gayle Power St Kitts And Nevis Patriots To Final vs St Lucia Kings, Universe Boss goes past 2500 runs in CPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.