कॉलीन डी ग्रँडहोमचे निधन?; न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या पोस्टनंतर उडाला गोंधळ, चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली!

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट ट्विट केली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 11:10 AM2021-09-15T11:10:42+5:302021-09-15T11:11:16+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand Cricket Twitter account posts Colin De Grandhomme ‘mullet’ is no more; fans thought player is dead | कॉलीन डी ग्रँडहोमचे निधन?; न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या पोस्टनंतर उडाला गोंधळ, चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली!

कॉलीन डी ग्रँडहोमचे निधन?; न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या पोस्टनंतर उडाला गोंधळ, चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट ट्विट केली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि किवींनी केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. ३५ वर्षीय गोलंदाज कॉलीन डी ग्रँडहोम याचा ( Colin De Grandhomme) फोटो पोस्ट करून किवी बोर्डानं The famous Colin de Grandhomme mullet is no more असे ट्विट केलं. त्यानंतर चाहत्यांनी असा समज करून घेतला की क्रिकेटपटूचेच निधन झाले. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी कॉलीन डी ग्रँडहोमनं त्याची हेअरस्टाईल बदलली. त्यानं लांब केस कापले आणि त्यामुळेच किवींनी ब्रेकिंग न्यूज चालवून हे ट्विट केलं. २०१९च्या वन डे वर्ल्ड कपनंतर ग्रँडहोम पुन्हा किवी संघात परतला आणि तो नव्या अवतारात.

IPL 2021 : एबी डिव्हिलियर्सची ‘360 degree’ फलंदाजी; १७ चेंडूंत ८८ धावांची आतषबाजी!

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ग्रँडहोमचा संघात समावेश नाही. त्यानं ४१ ट्वेंटी-२०, ४२ वन डे आणि २६ कसोटी सामन्यांत किवी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही तो २५ सामने खेळला आहे.    
 

नेटिझन्स संभ्रमात




न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानसोबत ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १७, १९ व २१ सप्टेंबर असे वन डे सामने होणार असून त्यानंतर २५, २६, २९ सप्टेंबर, १ व ३ ऑक्टोबर असे ट्वेंटी-२० सामने होतील. 
 

Web Title: New Zealand Cricket Twitter account posts Colin De Grandhomme ‘mullet’ is no more; fans thought player is dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.