Join us  

CPL 2020 : 48 वर्षीय प्रविण तांबेचा सुपर कॅच; किरॉन पोलार्डच्या कॅप्टनसीला नाही जवाब

CPL 2020 : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल) किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं सलग 9 विजयांची नोंद केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 9:07 PM

Open in App

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल) किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं सलग 9 विजयांची नोंद केली आहे. रविवारी दहाव्या सामन्यातही त्यांनी सेंट किट्स अँड पॅट्रीओट्स संघाविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. पोलार्डनं पहिली 12 षटकं चक्क फिरकीपटूंकडून टाकून घेतली आणि त्याचं फळ त्याला मिळाल. फवाद अहमदनं 21 धावांत 4 विकेट्स घेत, सर्वात यशस्वी गोलंदाजाचा मान पटकावला. पण, 48 वर्षीय प्रविण तांबेनं सर्वांची वाह वा मिळवली. त्यानं एक अफलातून झेल घेताना, तरुणांनाही लाजवेल असाच त्याचा झेल होता.

पॅट्रीओट्सनं प्रथम फलंदाजीचं आव्हान स्वीकारलं खरं, परंतु रायडर्सच्या गोलंदाजांसमोर त्यांना ते पेलवलं नाही. एव्हीन लुईस आणि ख्रिस लीन ही सलामीची जोडी अपयशी ठरली. सिकंदर रझा व अकील होसैन यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. त्यानंतर प्रविण तांबे व फवाद अहमद यांनी रायडर्सला यश मिळवून दिले. प्रविण तांबेनं 4 षटकांत केवळ 9 धावा देत 1 विकेट घेतली. होसैननं दोन, तर रझा, अली खान, अँडरसन फिलिप यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पॅट्रीओट्सचा डाव 18.2 षटकांत 77 धावांवर गडगडला. 

सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेन डंक यानं रिव्हर्स स्वीप मारलेला फटका बॅकवर्ड पॉईंटला तांबेनं सुरेख टीपला..पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट