Join us  

Covid-19 pandemic : सनरायझर्स हैदराबादची 30 कोटींची मदत, तर CSKनं राज्य सरकारला दिले 450 ऑक्सिजन संच

भारतात कोरोनाची दुसरी  लाट आली आहे. दररोज तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे आणि त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 12:55 PM

Open in App

भारतात कोरोनाची दुसरी  लाट आली आहे. दररोज तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे आणि त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला पाहायला मिळत आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. अशात अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेताना कडक निर्बंध लागू केली आहेत. कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) तामीळनाडू सरकारला 450 ऑक्सिजन संच दान करण्याचा निर्णय घेतला, तर सनरायझर्स हैदराबादनं सोमवारी दुसऱ्या लाटेत होरपळलेल्यांसाठी 30 कोटींची मदत जाहीर केली. ( Sun TV (SunRisers Hyderabad) is donating Rs.30 crores to provide relief to those affected by the second wave of the Covid-19 pandemic.) 

महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( 1 कोटी), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स ( 37 लाख), ब्रेट ली ( 40 लाख) यांनी आपापल्या परीनं कोरोना लढ्यात मदत केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व पत्नी अऩुष्का शर्मा यांनी 2 कोटींची मदत जाहीर करताना Ketto सह 7 कोटींचा निधी गोळा करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यांच्या या मोहिमेत युझवेंद्र चहल यानंही 95 हजारांची मदत केली आहे. राजस्थान रॉयल्स संघानंह 7.5 कोटींची मदत जाहीर केली. रिषभ पंतनेही मदतीचा हात पुढे केला आहे.

परिस्थिती गंभीर! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 2,26,62,575 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहे. मात्र याच दरम्यान ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन तुटवडा असल्याची नोटीस लावली आहे. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसरीकडे रुग्णाला उपचारासाठी दाखल करा असं देखील सांगण्यात येत आहे. अशी परिस्थिती असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासनरायझर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्स