ठळक मुद्देस्टीव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर IPL मध्येही खेळणार नाहीत ?मार्च 2019 मध्ये त्यांच्यावरील बंदी संपतेपाकिस्तान आणि विश्वचषक स्पर्धेसाठी राष्ट्रीय कर्तव्यावर
मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना जबर धक्का बसला आहे. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावरील बंदी कायम राहिल्याने ते IPL चा संपूर्ण हंगाम मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेळण्याची संधी मिळाली तरी ते दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ IPL मध्ये खेळू शकत नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांची चांगलीच कोंडी झाली आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना IPL मध्ये खेळण्यासाठी काही नियमावली बनावली होती. त्यानुसार त्यांना IPLच्या बऱ्याच सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणारी वन डे मालिका मार्चएवजी एप्रिलमध्ये होणार आहे. त्यामुळे 2019च्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी स्मिथ व वॉर्नर यांना ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघात स्थान पटकावण्याची संधी मिळणार आहे.
स्मिथ व वॉर्नर यांच्यावरील बंदी मार्च महिन्याच्या अखेरच्या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे ही दोघं IPLच्या पहिल्या टप्प्याला मुकणार आहेत. त्यांची पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी कांगारुंच्या संघात निवड झाल्यास ते एप्रिलमध्येही IPLचे सामने खेळू शकणार नाही. त्यानंतर विश्वचषक तयारीसाठी ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंना मे महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय कर्तव्यावर परतावे लागणार आहे. अशा परिस्थितीत स्मिथ व वॉर्नर यांचे IPLमध्ये खेळणे जवळपास अशक्यच दिसत आहे.