एका ऑस्ट्रेलियनवर विजय मिळवू शकलो नाही - सौरव गांगुली

ग्रेग चॅपेल यांना २००५ मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांचे भाऊ इयान चॅपेल हे देखील शंका घेत होते. सुनील गावसकर यांचेही विचार असेच होते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:25 IST2018-02-27T01:25:48+5:302018-02-27T01:25:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Could not win an Australian - Saurav Ganguly | एका ऑस्ट्रेलियनवर विजय मिळवू शकलो नाही - सौरव गांगुली

एका ऑस्ट्रेलियनवर विजय मिळवू शकलो नाही - सौरव गांगुली

नवी दिल्ली : ग्रेग चॅपेल यांना २००५ मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांचे भाऊ इयान चॅपेल हे देखील शंका घेत होते. सुनील गावसकर यांचेही विचार असेच होते. मी मात्र सर्व शंका बाजूला सारून स्वत: अंतरात्म्यानुसार चॅपेल यांच्या नियुक्तीस दुजोरा दिला.’ माजी कर्णधार सौरव गांगुली याने स्वत:च्या ‘अ सेंच्युरी इज नॉट इनफ’ या आत्मचिरित्रात हा खुलासा केला.
चॅपल यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याआधी गांगुलीने त्यांची मदत घेतली होती. २००३ च्या आॅस्ट्रेलिया दौºयाआधी मैदानाची माहिती घेणे, स्वत: आणि सहकाºयांची तयारी व्हावी, यासाठी गांगुली कोणालाही कळू न देता आॅस्ट्रेलियाला जाऊन आला होता. या मिशनमध्ये मदत करण्यास ग्रेग हे सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहेत, असे गांगुलीला वाटत होते. गांगुली लिहितो, ‘त्यावेळी पहिल्याच बैठकीत ग्रेग यांचे क्रिकेट ज्ञान मला प्रभावित करणारे होते. ही सोबत सर्वांत वादग्रस्त ठरेल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती.’
ग्रेग यांच्या नियुक्तीसंदर्भात सौरव म्हणतो, ‘२००४ मध्ये जॉन राईट यांची जागा भरण्याचा विचार पुढे आला तेव्हा ग्रेग चॅपल यांच्या रूपाने माझ्यापुढे पहिला पर्याय होता. आव्हानात्मक स्थितीत संघाला अव्वल स्थानावर पोहोचविण्यास चॅपेल सर्वोत्कृष्ट ठरतील, असे वाटले होते. मी जगमोहन दालमिया यांना स्वत:ची पसंती कळविली.’
‘काहींनी मला असा विचार करू नकोस असा सल्ला दिला होता. त्यात सुनील गावसकरही होते. सौरव पुन्हा एकदा विचार कर, असा त्यांनी मला सल्ला दिला. ग्रेग यांच्यासोबत राहताना संघात वाद निर्माण होऊ शकतो. ग्रेग यांचा कोचिंगचा रेकॉर्ड चांगला नाही असे गावसकरांचे मत होते,’ असेही गांगुलीने म्हटले आहे.
एका आॅसीवर विजय मिळवू शकलो नाही-
एक दिवस सकाळी दालमिया यांनी मला चर्चेसाठी घरी बोलविले. त्यांनी चर्चेच्यावेळी म्हटले की, ‘ग्रेग हे प्रशिक्षक म्हणून भारतासाठी सर्वोत्तम ठरू शकणार नाहीत, हे त्यांचा भाऊ इयान चॅपल यांचे मत आहे.’ पण मी सर्व शंका बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला.
यानंतर जे काही झाले ते सर्वांपुढे आहे. पण हेच आयुष्य आहे. काही गोष्टी तुमच्या मनानुसार होतात तर काही मनाविरुद्ध. आॅस्ट्रेलिया दौºयात कर्णधार या नात्याने मी त्या देशावर विजय मिळवला पण त्यांच्या एका नागरिकावर (ग्रेग) मात्र विजय मिळवू शकलो नाही असे सौरव गांगुली म्हणाला.

Web Title: Could not win an Australian - Saurav Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.