CoronaVirus: चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करायचा की नाही?

धसका कोरोनाचा : जगभरातील वेगवान गोलंदाजांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:02 AM2020-04-21T00:02:03+5:302020-04-21T06:52:54+5:30

whatsapp join usJoin us
CoronaVirus Whether to use saliva to brighten the ball bowlers confused | CoronaVirus: चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करायचा की नाही?

CoronaVirus: चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करायचा की नाही?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये चेंडूला चकाकी आणण्यासाठी वेगवान गोलंदाज लाळेचा वापर करतात. कोरोना व्हायरसमुळे मात्र चेंडूची चमक कायम राखण्यासाठी ही पद्धत सुरू ठेवावी काय, याचा फेरविचार करावा लागणार आहे.

द. आफ्रिकेत २०१८ ला चेंडू कुरतडण्याचा प्रकार घडताच चेंडू चमकविण्याच्या प्रकारावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असले तरी लाळ आणि घाम याचा वापर अद्यापही वैध आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे क्रिकेट लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. अशावेळी व्यंकटेश प्रसाद, प्रवीण कुमार किंवा जेसन गिलेस्पी यांच्या मते, क्रिकेटचे संचालन सुरू होताच आयसीसीला लाळ आणि घाम यांचा चेंडूवर वापर करायचा की नाही या नियमाचा फेरविचार नक्की करावा लागेल.

३३ कसोटी आणि १६१ एकदिवसीय सामने खेळणारा व्यंकटेश म्हणाला, ‘क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यानंतर काही काळ केवळ घामाचा वापर करण्याची मुभा दिली जावी. खेळाडूंचे आरोग्य महत्त्वाचे आहे. चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर न केल्याने गोलंदाजांना थोडा त्रास होईल, मात्र हीच काळाची गरज आहे , हे लक्षात घ्यावे लागेल.’ मागच्या महिन्यात भारत-द. आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत लाळेच्या वापराबाबत मोठी चर्चा गाजली होती. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने लाळेचा वापर करण्याचे संकेत दिले होते.नंतर कोरोनामुळे ही मालिका रद्द करण्यात आली.
चेंडूचे स्वरूप चांगले ठेवण्यासाठी केवळ घामाचा वापर होऊ शकेल, पण व्यंकटेशच्या मते हे सोपे नाही.स्विंग चेंडूच्या बळावर स्वत:ची ओळख निर्माण करणारा प्रवीण कुमार म्हणाला, कोरोनानंतर क्रिकेट सुरू झाल्यास काही काळासाठी लाळेचा वापर बंद करायला हवा.’ ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी याने खेळात लाळेच्या वापराचा फेरविचार करण्याची मागणी केली. (वृत्तसंस्था)

‘मैदानावर सर्वांना घाम येतोच असे नाही. ज्याला घाम फुटतो अशा खेळाडूंकडे चेंडू सोपवावा लागेल. माझ्यावेळी मी राहुल द्रविडकडून चेंडूला घाम लावण्याचे काम करून घेत होतो.’
- व्यंकटेश प्रसाद

वेगवान आणि फिरकी गोलंदाज लाळेचा वापर करतात. लाळेमुळे नवा चेंडू स्विंग करणे आणि जुना चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यास मदत होते, हे सत्य आहे.’
- प्रवीण कुमार

‘माझ्या मते, हा विचित्र प्रश्न नाही. यावर खरेतर फेरविचार व्हावा. गोलंदाजीची भेदकता केवळ घाम आणि लाळ यावर नव्हे तर परिस्थिती कशी आहे, यावर बऱ्याच अंशी विसंबून असते.’
- जेसन गिलेस्पी

Web Title: CoronaVirus Whether to use saliva to brighten the ball bowlers confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.