Join us

Coronavirus: "या महिला क्रिकेटपटूने कोरोनामुळे आई आणि बहिणीला गमावले, पण BCCIने साधे सांत्वनही नाही केले"

Indian Women's Cricket Team News: दु:खाच्या घडीमध्ये बीसीसीआयने वेदा कृष्णमूर्ती हिची साधी विचारपूसही केली नाही, असा आरोप ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लिसा स्थळेकर हिने केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 21:07 IST

Open in App

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावले आहे. यामध्ये भारताच्या काही क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. या क्रिकेटपटूंमध्ये भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती हिने तिची आई आणि बहिणीला गमावले आहे. मात्रा दु:खाच्या घडीमध्ये बीसीसीआयने वेदा कृष्णमूर्ती हिची साधी विचारपूसही केली नाही, असा आरोप ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लिसा स्थळेकर हिने केला आहे. (Veda Krishnamurthy lost her mother and sister due to Coronavirus, but the BCCI did not offer a simple consolation )

या दु:खाच्या प्रसंगी बीसीसीआयने वेदासोबत चार शब्द बोलले नाहीत, तसेच या प्रसंगाची ती कसा सामना करत आहे, याचीही विचारपूस केली नाही, असा आरोप लिसा स्थळेकर हिने लगावला आहे. लिसा स्थळेकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात वेदा कृष्णमूर्तीचा समावेश न करण्याचा निर्णय़ योग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र या दु:खद प्रसंगी तिच्यासोबत अजिबात संवाद न साधणे धक्कादायक आहे, असे मत लिसाने मांडले.

लिसा स्थळेकर म्हणाली की, एका खऱ्या क्रिकेट संघाने आपल्या खेळाडूंची काळजी घेतली पाहिजे. केवळ खेळावर लक्ष केंद्रित करून भागणार नाही. कोरोनाच्या या महामारीच्या काळा अनेक खेळाडूंनी तणाव, चिंता, भय आणि दु:खाचा सामना केला. तर व्यक्तिगतरीत्याही त्यांच्यासाठी ही बाब कठीण जाणार आहे. तसेच अनपेक्षितपणे खेळांसाठीही नुकसानकारक ठरणार आहे. 

वेदा कृष्णमूर्तीने आई आणि बहिणीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावाने सोशल मीडियावर एक भावूक पत्र लिहिले होते. वेदाच्या आईचे निधन २३ एप्रिल रोजी झाले होते. तर वेदाची बहीण वत्सला शिवकुमार हिचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. वेदा कृष्णमूर्ती हिने भारतासाठी ४८ एकदिवसीय आणि ७६ टी-२० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआयकोरोना वायरस बातम्याभारत