Join us

CoronaVirus: स्टाफसाठी सुपर मार्केटमध्ये तात्पुरत्या नोकरीच्या शोधात क्रिकेट ऑस्ट्रेलिया

आर्थिक चणचणीमुळे जूनपर्यंत कर्मचाऱ्यांना पाठवले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 07:11 IST

Open in App

मेलबोर्न : कोरोनामुळे आर्थिक विवंचनेचा सामना करीत असलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सहयोगी स्टाफला जूनच्या अखेरपर्यंत डच्चू दिला. अशा कर्मचाऱ्यांना ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध वूलवर्थस या सुपरमार्केटमध्ये नोकरी मिळवून देण्याचा सीएचा प्रयत्न आहे.सीईओ केविन रॉबर्ट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही वूलवर्थसमध्ये स्टाफला सामावून घेण्याची विनंती केली. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे स्थानिक आंतरराष्ट्रीय आयोजनात आर्थिक तोटा झाला.तिकीट विक्रीतून मिळणारी पाक कोटी डॉलर रक्कम गमवावी लागली. यामुळे कठोर पावले उचलावी लागली. जो स्टाफ नोकरीवर आहे त्यांना एकूण पगाराच्या २० टक्के रक्कम दिली जात आहे. सीईओ स्वत: ८० टक्के वेतन घेत आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआॅस्ट्रेलिया