Corona Virus : भारतीय गोलंदाजाचा पुढाकार; 100 गरीबांना करतोय अन्नदान

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 02:36 PM2020-04-02T14:36:16+5:302020-04-02T14:48:01+5:30

whatsapp join usJoin us
Corona Virus : Ishan Porel to arrange basic food and grocery for 100 people in his locality svg | Corona Virus : भारतीय गोलंदाजाचा पुढाकार; 100 गरीबांना करतोय अन्नदान

Corona Virus : भारतीय गोलंदाजाचा पुढाकार; 100 गरीबांना करतोय अन्नदान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लॉकडाऊनच्या काळात रोजंदारी कामगार व गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, मेरी कोम आदी सर्वांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली आहे. या दिग्गजांपाठोपाठ भारताचा युवा गोलंदाजही मदतीसाठी पुढे आला आहे. भारताचा युवा गोलंदाज इशान पोरेलनं पंतप्रधान सहाय्यता निधीत आर्थिक मदत करण्याबरोबरच 100 गरीबांची जबाबदारी घेतली आहे.

2018च्या युवा वर्ल्ड कप ( 19 वर्षांखालील) विजेत्या संघातील सदस्य असलेल्या बंगालच्या पोरेलनं कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करायला हवे, असे म्हटले आहे. त्यानं स्थानिक गरीब कुटुबीयांना जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्धार केला आहे. त्याच्या या निर्धारात त्याचे कुटुंबीयही सहभागी आहेत. तो म्हणाला,''सर्वांना आपापल्या परीनं गरजूंना मदत करायला हवी. मी माझ्याकडून मदत करत आहे. त्याशिवाय मी येथील गरीब कुटुंबांना जेवण पुरवण्याचं काम करत आहे. पुढील दोन दिवस माझ्या आई-वडिलांसह मी या कुटुंबांना अन्न पुरवणार आहोत.''

लॉकडाऊन असले तरी अनेक लोकं रस्त्यावर भटकत आहेत. इशान म्हणाला,''लोकं अजूनही घराबाहेर पडत आहेत, हे मी टिव्हीवर पाहत आहे. असं करून ते स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात आणत आहेत. त्यांना विनंती करतो की घरीच थांबा.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

World Cup 2011च्या विजयाचं श्रेय MS Dhoni ला दिलं म्हणून भडकला गौतम गंभीर , म्हणाला...

World Cup विजयाबरोबर टीम इंडियाचा अजरामर विक्रम; जगात कुणालाच जमणार नाही असा पराक्रम

तुम्ही देशासाठी काय केलंत? गौतम गंभीरनं विचारला सवाल; दोन वर्षांचा पगार केला दान

Video : टीम इंडियाचा सलामीवीर बनला 'आचारी'; लॉकडाऊनमध्ये करतोय Part Time काम

जसप्रीत बुमराह करतो स्वयंपाक अन् भांडी घासण्याचं काम  

 आफ्रिदीला पाठिंबा देण्यावरून टीका करणाऱ्यांना हरभजन सिंगनं सुनावलं

 

Web Title: Corona Virus : Ishan Porel to arrange basic food and grocery for 100 people in his locality svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.