जसप्रीत बुमराह करतो स्वयंपाक अन् भांडी घासण्याचं काम  

रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह चाट; घरात बसून लढाईचे केले लोकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:23 PM2020-04-02T12:23:31+5:302020-04-02T12:24:04+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah does the cooking and rubbing dishes svg | जसप्रीत बुमराह करतो स्वयंपाक अन् भांडी घासण्याचं काम  

जसप्रीत बुमराह करतो स्वयंपाक अन् भांडी घासण्याचं काम  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जागतिक स्तरावरील भारताचा अव्वल जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या घरकामात आईला मदत करत आहे. स्वयंपाक, घरकाम, भांडी धुणे अशा कामातही तो हातभार लावत असल्याचे त्याने रोहित शर्माशी इन्स्टाग्राम चॅटवर सांगितले. घरात बसून घेत असलेले अनेक गमतीशीर किस्सेही त्याने यावेळी शेअर केले. 
रोहित शर्माने अर्धा तास इन्स्टाग्रामवर बुमराहशी चॅट केले.

रोहितने बुमराहला घरी बसून काय करतोस असे विचारल्यानंतर बुमराहने लगेचच भांडी धुणे, आईला स्वयंपाकास मदत करणे तसेच घरकाम करणे असे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यावर रोहितने हसत त्याला दाद दिली. रोहितनेही आपण लहानपणी घरातील अशी सर्व कामे करीत होतो, असा अनुभव सांगितला. आता या गोष्टींची सवय नसल्याने थोडे वेगळे वाटते, असेही तो म्हणाला. 


घरात आम्ही बॅटिंगचा सराव कसाही करू शकतो, मात्र एक गोलंदाज म्हणून तू कसा सराव करतोस, असा सवालही रोहितने केला. त्यावर बुमराहने सांगितले की, धावण्याचा सराव करणे कठीण बनले आहे. तेवढी पुरेशी जागा घरात नाही. तरीही घरच्या घरी जो व्यायाम करीत आहे, त्यात प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून रिपिटेशन वाढवित आहे. त्याचा फायदा होत आहे. गोलंदाजांसाठी हा काळ कठीण व परीक्षा घेणारा आहे. देव खुप कठीण परीक्षा घेत असल्याचेही तो म्हणाला. 

रोहितने सांगितले की कोरोनामुळे लॉकडाऊन नसता तर आज हैद्राबादबरोबर आमची मॅस असती. किती छान अनुभव आपणास घेता आला असता, पण दुर्दैव की कोरोनासारख्या साथीने आपल्या सर्वांना घरी बसविले आहे. लोकांनी संयम पाळला तर कदाचित आपण लवकर बाहेर येऊ, अन्यथा बरेच दिवस घरात बसावे लागेल. 


चहलवर केले विनोद
रोहित शर्मा आणि बुमराहने भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलवर अनेक विनोद केले. त्याची फिरकीही घेतली. शर्मा म्हणाला की बुमराहला चहलपूर्वी फलंदाजीस यायला हवे, कारण चहलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर एकही षटकार मारला नाही. याऊलट बुमराहने दिग्गज गोलंदाजांना षटकार खेचले आहे. त्यामुळे चहलने एकतरी षटकार मारून दाखवावा, असे आव्हान दोघांनी यावेळी दिले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

World Cup 2011च्या विजयाचं श्रेय MS Dhoni ला दिलं म्हणून भडकला गौतम गंभीर , म्हणाला...

World Cup विजयाबरोबर टीम इंडियाचा अजरामर विक्रम; जगात कुणालाच जमणार नाही असा पराक्रम

तुम्ही देशासाठी काय केलंत? गौतम गंभीरनं विचारला सवाल; दोन वर्षांचा पगार केला दान

Video : टीम इंडियाचा सलामीवीर बनला 'आचारी'; लॉकडाऊनमध्ये करतोय Part Time काम

Web Title: Jasprit Bumrah does the cooking and rubbing dishes svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.