Join us  

जात, धर्म, लिंग सर्व गौण; केवळ माणुसकी महत्त्वाची; गौतम गंभीरची तृतीयपंथीयांना मदत

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात 17मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:47 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात 17मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटात स्थलांतरीत मजूरांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. हातावर पोट असलेल्या मजूरांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जमेल तसं, मिळेल त्या वाहनानं ही मजूर आपापल्या गावी परतण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या संकट काळात अनेक जण त्यांच्या मदतीला पुढेही आले आहेत. त्यांना अन्न पुरवत आहेत. यात भारताचा माजी सलामीवर आणि दिल्लीचा खासदार गौतम गंभीर याचाही समावेश आहे. या मजूरांसोबतच गंभीरनं आता तृतीयपंथीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनतर्फे तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे. 

Salute: कोरोनामुळे निधन झालेल्या पोलिसाच्या कुटुंबासाठी Gautam Gambhir चं मोठं पाऊल 

गौतम गंभीरनं जपली माणुसकी; घरकाम करणाऱ्या महिलेचे स्वतः केले अंत्यसंस्कार

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी नवी दिल्ली सरकारच्या मदतीला सर्वात आधी गौतम गंभीर पुढे आला. त्यानं दिल्ली सरकारला एक कोटींचा निधी दिला. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनला प्रतिसाद देताना त्यानं दोन वर्षांचा पगारही सहाय्यता निधीत देणार असल्याचे जाहीर केले. खासदार फंडातूनच नव्हे तर गौतम गंभीर त्याच्या फाऊंडेशनच्या मदतीनंही समाजकार्य करत आहे. दिल्लीतील मजूरांना गौतम गंभीर फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे. कोरोना व्हायरशसी मुकाबला करताना निधन झालेल्या दिल्ली पोलिसाच्या कुटुंबाची जबाबदारीही गौतम गंभीरनं उचलली आहे. 

त्यानं आणखी एका कृतीतून माणुसकीचं दर्शन घडवलं. गौतम गंभीर फाऊंडेशनतर्फे तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं गेलं. गंभीरनं सोशल मीडियावरून ही माहिती दिली आणि त्यानं आपल्या टीमचं कौतुकही केलं. त्यानं लिहिलं की,'' जात, धर्म, लिंग सर्व गौण आहे. केवळ माणुसकी महत्त्वाची आहे. माझ्या टीमचं मी कौतुक करतो की त्यांनी ती जपली आणि तृतीयपंथीयांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचलव्या.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पाकमधील हिंदूंना अन्न वाटप करणारा शाहिद आफ्रिदी बांगलादेशच्या मदतीला धावला

Video : म्युझिक व्हिडीओसाठी लिओनेल मेस्सीचे पत्नीसोबत लिपलॉप; नेटिझन्सकडून ट्रोल

पतीच्या आठवणीनं सानिया मिर्झा भावुक; म्हणाली, इझान आपल्या बाबांना कधी भेटेल माहीत नाही!

Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का?

Good News : टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यास BCCI तयार, पण...

टीम इंडियाचे खेळाडू सरावाला लागणार, पण विराट अन् रोहित यांना घरीच रहावे लागणार!

निधी गोळा करण्यासाठी शोएब अख्तरनं घेतली 'शाहरुख खान'च्या नावाची अशी मदत! 

शाहिद आफ्रिदीनं पुन्हा उपस्थित केला काश्मीर मुद्दा; भारतीयांनी घेतली शाळा 

टॅग्स :गौतम गंभीरकोरोना सकारात्मक बातम्या