Asia Cup Rising Stars 2025 : आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' यांच्यातील सामन्यात एका रिले कॅचसंदर्भात तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयावर भारतीय संघातील खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेहाल वढेरा आणि नमन धीर जोडीनं सीमारेषेवर कमालीचा ताळमेळ दाखवत पाकिस्तानच्या माझ सदाकत याने मारलेला फटका कॅचमध्ये बदलला. पण तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहून रिले कॅच अवैध ठरवला. भारतीय 'अ' संघाचा कर्णधार जितेश शर्मासह संघातील खेळाडूंनी यावर आक्षेप घेतला. तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या वातावरणामुळे सामना जवळपास पाच मिनिटे थांबवण्याची वेळ आली. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
नेमकं काय घडलं?
पाकिस्तानच्या डावातील १० व्या षटकात भारताकडून सूयश शर्मा गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर सादाकतने मोठा फटका खेळला. नेहल वढेरा याने सीमारेषेवर चपळाई दाखवत चेंडू अडवला. त्याने चेंडू मैदानात फेकल्यावर नमन धीरनं कॅच पूर्ण केला. पण तिसऱ्या पंचांनी हा कॅच अवैध ठरवला. वढेराचा पाय सीमारेषेला लागला नसताना फलंदाजाला नाबाद कसा? भारतीय संघासोबत चिटिंग झाली का? असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण होऊ शकतो. पण तसं काही झालं नाही. नव्या नियमाच्या आधारावर पंचांनी पाकिस्तानी बॅटरला नाबाद ठरवलं.
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
काय सांगतो नियम?
पाकिस्तानी बॅटरचा मारलेला फटका कॅचमध्ये रुपांतरित करण्यासाठी वढेराने सीमारेषा ओलांडण्याआधी चेंडू मैदानात फेकला. नमन धीरने रॅली कॅच उत्तमरित्या पूर्णही केला. पण एमसीसी (Marylebone Cricket Club) च्या नव्या नियमानुसार, जर पहिला फील्डर सीमारेषेबाहेर गेला असेल आणि तो पुन्हा मैदानात परत आला नसेल तर दुसऱ्या फील्डरने कॅच पूर्ण केला, तरी देखील कॅच वैध मानला जाणार नाही, असा नियम आहे. त्यामुळेच पाकिस्तानी खेळाडू नाबाद राहिला.
Web Summary : India A vs Pakistan A Asia Cup match saw controversy over a relay catch. Umpires deemed it invalid based on MCC rules, sparking debate and a brief match stoppage. Waderas foot was not on the line, but the catch was deemed illegal.
Web Summary : भारत ए बनाम पाकिस्तान ए एशिया कप मैच में रिले कैच पर विवाद हुआ। MCC नियमों के आधार पर अंपायरों ने इसे अमान्य करार दिया, जिससे बहस और खेल में रुकावट आई। वढेरा का पैर लाइन पर नहीं था, फिर भी कैच अवैध माना गया।