IPL 2026, KKR vs LSG Controversial Catch Finn Allen Given Out Despite Digvesh Rathi : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील सामन्यात फिन ॲलनच्या विकेटसंदर्भातील पंचाचा निर्णय वादग्रस्त ठरला. ईडन गार्डन्सच्या मैदानात नाणेफेक गमावल्यावर फिन ॲलन आणि KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणे याने कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाी सुरुवात केली. दुसऱ्याच षटकात फिन ॲलन याने एक मोठा फटका खेळला अन् सीमारेषेवर दिग्वेश राठीनं त्याचा झेल टिपला. पण हा झेल घेताना त्याचा पाय सीमारेषेला लागल्याचा दावा करत फिन ॲलन याने षटकार मारून विकेट गमावल्याची चर्चा रंगली. नेमकं काय घडलं? तो आउट होता की नॉटआउट? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आउट की, षटकार? फिन ॲलनच्या विकेटवरुन वाद! नेमकं काय घडलं?
प्रिन्स यादवच्या दुसऱ्या षटकात फिन ॲलन याने मोठा फटका खेळला. सीमारेषेवर दिग्वेश राठीनं त्याचा झेल टिपला. पण रिप्लेमध्ये दिग्वेश राठीचा पाय सीमारेषेला हलकासा स्पर्श झाल्याचे दिसून आले. पंचांनी हा झेल पक्का झाला याची खात्री करण्याची तसदी न घेता फिन ॲलन याला आउट ठरवले. त्याने ८ चेंडूत ९ धावा केल्या. या विकेटवरून IPL मधील पंचगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे फिन ॲलनच्या खात्यात सहा धावा जमा होण्याऐवजी त्याच्यावर तंबूत परतण्याची वेळ आली, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
क्रिकेट चाहत्यांनी घेतली पंचांची शाळा
फिन ॲलन हा आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या विकेटचा व्हिडिओ आणि दिग्वेश राठीने सीमारेषेवर झेल पकडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर एका वापरकर्त्यांने लिहिलंय की, फिन ॲलन हा आउट नव्हता. दिग्वेशचा पाय सीमारेषेला स्पर्श झाल्याचे स्पष्ट दिसून येते. पण पंचांनी ते तपासून पाहण्याचे कष्टच घेतले नाहीत. याच धाटणीच्या अनेक प्रतिक्रिया उमटत असून फिन ॲलनची विकेटवरुन नवा वाद चर्चेचा विषय ठरत आहे.