Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक-नताशाला मुंबई इंडियन्सच्या हटके शुभेच्छा; कार्टुन फोटो व्हायरल

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 13:54 IST

Open in App

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या घरी पाळणा हलला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिकनं त्याला मुलगा झाल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.  या गोड बातमीनंतर सोशल मीडियावर हार्दिक-नताशा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मुंबई इंडियन्सनंही या जोडीचं कौतुक केलं, परंतु त्यांनी तयार केलेलं पांड्या कुटुंबीयांचं कार्टुन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासात राज्यातील युवा मंत्र्याचा दबाव; भाजपा आमदाराचं थेट दिल्लीला पत्र

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का देत आला आहे. 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यानं बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करण्याचे जाहीर केले. त्याच्या साखरपुड्याची कल्पना घरच्यांनाही नव्हती. शिवाय त्यानं गेल्या महिन्यात नताशा प्रेग्नंट असल्याचे जाहीर करून गुपचूप लग्नही उरकले. बाप होण्याची जबाबदारी खांद्यावर आल्यापासून हार्दिक जबाबदार झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रेग्नंट नताशाला प्रसन्न ठेवण्यासाठी त्यानं फुलांचा गुच्छा भेट दिला होता. 

हार्दिक आणि नताशा यांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला. हार्दिकनं ही बातमी सोशल मीडियावरून सर्वांना सांगितली. हार्दिकच्या या सरप्राईजबद्दल त्याच्या कुटुंबीयांनाही माहित नव्हते.  मुंबईत एका पार्टित या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. नताशानं बॉलिवूडमधील काही चित्रपटांत काम केलं आहे.    

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

श्रीसंतच्या रुममध्ये राहायच्या मुली, लाखो रुपयांचं व्हायचं बिल; क्रिकेटपटूचा धक्कादायक गौप्यस्फोट!

Sex Workersच्या मुलीही 'पंख' पसरून घेणार भरारी; गौतम गंभीरने घेतली जबाबदारी

दोन देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोलंदाजाचा पराक्रम; इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का! 

आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत इंग्लंडनं उघडलं खातं!

 

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचमुंबई इंडियन्स