Join us

VIDEO: धडामssss.... कॉमेंट्री बॉक्समध्ये नासिर हुसेन खुर्चीवरून पडला, नक्की काय घडलं?

Nasser Hussain fall down Video: श्रीलंकेने सामना जिंकला तर इंग्लंडने मालिका जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 18:41 IST

Open in App

Nasser Hussain fall down Video: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ओव्हलवर खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी २१९ धावांचे लक्ष्य होते. श्रीलंकेने ८ गडी राखून सामना जिंकला. तर इंग्लंडने २-१ अशी कसोटी मालिका जिंकली. पण सध्याच्या चर्चेचा विषय काही वेगळाच आहे. सामन्यातील चर्चेचा विषय खेळाडू नसून समालोचक आणि इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन आहे.

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याची कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून कॉमेंट्री करत असताना हा प्रकार घडला. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. मैदानावर वेगवान गोलंदाज असलेला ख्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. २ चेंडू वेगवान टाकल्यानंतर वोक्सने षटकातील उरलेले ४ चेंडू स्पिन बॉलिंगने टाकायचे ठरवले. अशा परिस्थितीत त्याची बॉलिंग पाहून नासिर हुसेनला हसू अनावर झाले. तशातच तो खुर्चीतून खाली पडला.

तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू असताना श्रीलंकेच्या डावात हे दिसून आले. दुसऱ्या सत्रात अवघा अर्धा तास उलटून गेला असता मैदानावर ढग जमा झाले. त्यामुळे प्रकाश कमी होता. अशा परिस्थितीत अंपायरने हस्तक्षेप केला. आता या स्थितीत एकतर संघ पॅव्हेलियनमध्ये परततात किंवा खेळ सुरू ठेवण्यासाठी त्यांना वेगवान गोलंदाजाऐवजी स्पिनरकडून गोलंदाजी करावी लागते. म्हणून ख्रिस वोक्सने स्पिन गोलंदाजी केली.

टॅग्स :इंग्लंडश्रीलंकासोशल मीडिया