Join us

Rohit Sharma, IPL 2022: Mumbai Indians च्या ताफ्यात दाखल होताच कोच महेला जयवर्धनेची रोहितवर भन्नाट कमेंट, सारेच झाले हसून लोटपोट (Video)

कसोटी मालिका संपताच रोहित मुंबई इंडियन्सच्या बायो-बबलमध्ये झाला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 20:08 IST

Open in App

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022: भारतीय संघाने श्रीलंका संघावर टी२० आणि कसोटी अशा दोन्ही मालिकांमध्ये विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने लंकेला टी२० मालिकेत ३-० आणि कसोटी मालिकेत २-० असं पराभूत केलं. कसोटी मालिका लवकर संपल्यामुळे सर्व भारतीय खेळाडू IPL च्या तयारीसाठी आपापल्या फ्रँचायसींसोबत ठरलेल्या हॉटेल्समध्ये दाखल झाले. रोहितदेखील मुंबई इंडियन्सच्या संघासोबत सामील झाला. त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने याने रोहितवर केलेल्या मजेशीर कमेंटमुळे सारेच हसून लोटपोट झाले.

रोहित शर्मामुंबई इंडियन्सच्या (MI) कॅम्पमध्ये आला. सोबतच जसप्रीत बुमराहनेही मुंबईच्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित सोमवारी मुंबईतील टीम हॉटेलमध्ये आपली मुलगी समायराला कडेवर घेऊन प्रवेश करताना दिसला. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक पॉल चॅपमन, गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पॅमेंट यांनी रोहितचे जोरदार स्वागत केले. त्याच वेळी महेलाने कमेंट केली की, कर्णधारपद मिळाल्यापासून आता रोहितचे केस पिकायला लागलेत. माझ्यापेक्षा त्याचे जास्त केस पांढरे होत चाललेत... या विधानानंतर तेथील साऱ्यांना हसू आवरलं नाही.

दरम्यान, श्रीलंका मालिकेपूर्वी रोहितची विराट कोहलीच्या जागी भारताचा सर्व प्रकारचा क्रिकेटमधील कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. मुंबई इंडियन्सचं नेतृत्व देखील रोहित करणार आहे. कर्णधार रोहितने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीत मुंबईला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स २७ मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स (DC) विरोधात सलामीचा सामना खेळणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्सजसप्रित बुमराह
Open in App