Jasprit Bumrah Coldplay Concert Navi Mumbai : नवी मुंबईत नुकताच कोल्डप्ले चा मोठी कॉन्सर्ट झाली. तुडुंब गर्दी झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये अनेक बड्या लोकांनी हजेरी लावली. त्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने व्हिडीओच्या माध्यमातून हजेरी लावली. पण महत्त्वाची बाब म्हणजे, त्याचा एका मॅचमधील व्हिडीओ लावण्यात आला. कोल्डप्लेचा मुख्य गायक ख्रिस मार्टिन सलग दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहबद्दल बोलला. रविवारी डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या शोमध्ये ख्रिस मार्टिनने बुमराहचे वेगळ्याच शैलीत कौतुक केले. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराहने ओली पोपला यॉर्कर टाकत त्रिफळाचीत केले होते. तो व्हिडीओ त्याने कॉन्सर्ट दरम्यान प्ले केला.
ख्रिस मार्टिन बुमराहबद्दल काय म्हणाला?
ख्रिस मार्टिन म्हणाला, 'काल आम्ही आमच्या शोमध्ये सांगितले होते की जसप्रीत बुमराहने आम्हाला शो थांबवण्यास सांगितले कारण तो बॅकस्टेजला आहे आणि आम्हाला गोलंदाजी करू इच्छित आहे. हे खरे नव्हते, खोटे होते. मला खूप वाईट वाटले. आज बुमराहने आपल्याला एक गंभीर इशारा दिलाय. तो म्हणालाय की, मी तुम्हाला तुमच्या शोमध्ये माझ्याबद्दल बोलण्याची परवानगी दिली नव्हती. मी जगातील सर्वात महान गोलंदाज आहे. म्हणून जसप्रीतबद्दल पूर्ण आदर आणि प्रेम व्यक्त करत त्याची एक क्लिप पाहूया आणि त्याला आपल्याकडून खूप सारं प्रेम पाठवूया.
ख्रिस मार्टिनने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले आणि तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे म्हटले. बुमराहच्या गोलंदाजीचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसला तेव्हा संपूर्ण स्टेडियम बूम बूम बुमराहच्या जयघोषाने दुमदुमून गेले.
कोल्डप्ले चा भारत दौरा
कोल्डप्लेची सध्या म्युझिक ऑफ द स्फेयर्स वर्ल्ड टूर सुरू आहे. १८ आणि १९ तारखेनंतर हा बँड २१ जानेवारीला देखील नवी मुंबईतच सादरीकरण करेल. यानंतर, २५ आणि २६ जानेवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्यांचा एक कार्यक्रम आहे.
Web Title: coldplay concert navi mumbai jasprit bumrah yorker clean bowled video played during live show
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.