टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी द्यावी लागणार कठीण परीक्षा; शास्त्री गुरुजींचं कठोर पाऊल

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांनी पुन्हा निवड झाली. प्रशिक्षकपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये कामगिरीचा आलेख उंचावण्यासाठी शास्त्री सज्ज आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 11:47 AM2019-09-10T11:47:37+5:302019-09-10T11:48:10+5:30

whatsapp join usJoin us
Coach Ravi Shastri to increase India’s minimum Yo-Yo mark to 17 ahead of South Africa series: Report | टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी द्यावी लागणार कठीण परीक्षा; शास्त्री गुरुजींचं कठोर पाऊल

टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी द्यावी लागणार कठीण परीक्षा; शास्त्री गुरुजींचं कठोर पाऊल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांनी पुन्हा निवड झाली. प्रशिक्षकपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये कामगिरीचा आलेख उंचावण्यासाठी शास्त्री सज्ज आहेत आणि त्यांनी खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडे लक्ष केंद्रीत करताना काही कठोर पाऊलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला कठीण परीक्षेचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघातील स्थान पक्के करण्यासाठी  यो-यो टेस्टमध्ये 16.1 गुण मिळवणे, क्रमप्राप्त होते. पण, आता शास्त्रींनी गुणांची मर्यादा वाढवली आहे. 


बंगळुरू टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार यो-यो टेस्टमधील गुणांची मर्यादा 17 पर्यंत वाढवण्याचा विचार शास्त्री करत आहेत. आगामी काही दिवसांत याबाबत शास्त्री एक बैठक बोलावून सर्वांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघ निवडताना प्रत्येक खेळाडूला या टेस्टमध्ये शास्त्रींचे निकष पूर्ण करावे लागतील.  

खूशखबर : रोहित शर्मा कसोटीतही ओपनिंग करणार, निवड समिती प्रमुखांचे सूचक विधान

दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. 15 सप्टेंबरपासून ट्वेंटी-20 सामन्याने या मालिकेला सुरुवात होणार आहे. 18 व 22 सप्टेंबरला अनुक्रमे दुसरा व तिसरा ट्वेंटी-20 सामना होईल. त्यानंतर 2 ते 6 ऑक्टोबर ( विशाखापट्टणम्), 10 ते 14 ऑक्टोबर ( पुणे) व 19 ते 23 ऑक्टोबर ( रांची) येथे अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा कसोटी सामना होणार आहे. 


 
काय आहे Yo-Yo test?
यो यो टेस्टमध्ये खेळाडूंच्या सहनशक्तीची ( endurance) कसोटी पाहिली जाते. डेनमार्कचे फुटबॉल मानसोपचारतज्ञ जेन्स बँगस्बो ही परीक्षा घेतात. मोहम्मद शमीसह युवराज सिंग, संजू सॅमसन हे यो यो कसोटीत नापास झाले होते.

Web Title: Coach Ravi Shastri to increase India’s minimum Yo-Yo mark to 17 ahead of South Africa series: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.