वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंच्या तोंडी सध्या एकच नाव चर्चिले जात आहे आणि ते म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांचे... मोदींच्या एका निर्णयामुळे क्रिकेटपटू त्यांचे फॅन झाले आहेत आणि त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर ख्रिस गेल ( Chris Gayle) यानंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण गायला आहे. प्रसिद्ध कृष्णा ठरणार इंग्लंड संघासाठी कर्दनकाळ?; जाणून घ्या त्याची कामगिरी
जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा काही देशांना खूप मोठा फटका बसला आहे आणि अशा देशांसाठी भारतानं मदतीचा हात पुढे केला आहे. भारतानं जगभरातील काही देशांना कोरोना लसीचे डोस पाठवले आहेत. भारतानं आतापर्यंत भूटान, मालदीप, मॉरिशस, बहरीन, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका या देशांना कोरोना लस पाठवली आहे. कॅरेबियन बेटावरही भारतानं कोरोना लसीचे डोस पाठवले आहेत.वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; कृणाल पांड्या, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी
ख्रिस गेलनं ट्विट केलं की,''पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार आणि देशवासीयांचे मी आभार मानतो. त्यांनी जमैकाला कोरोना लस गिफ्ट म्हणून पाठवले आणि या महामारीपासून वाचण्यासाठी आम्हाला मदत केली.''
आंद्रे रसेल यानंही नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व्हिव्हिए रिचर्ड्स यांनी ट्विट केलं की, अँटीगा आणि बार्बाडोस येथील लोकांच्या वतीनं मी भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला कोरोना लस पाठवली. यानं भविष्यात दोन देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील.''