Join us

विमान कंपनीवर बरसला ख्रिस गेल; कन्फर्म तिकीट असूनही नाकारला प्रवास

युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलसोबत सोमवारी धक्कादायक प्रकार घडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 18:15 IST

Open in App

युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलसोबत सोमवारी धक्कादायक प्रकार घडला. कन्फर्म तिकीट असूनही Emirates Airlineने विमान फुल्ल झाल्याचं सांगून गेलला प्रवास नाकारला. इतकेच नाही तडजोड म्हणून विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीनं बिझनेस क्लासचं तिकीट असलेल्या गेलला इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करण्यास सांगितले. त्यामुळे गेल प्रचंड संतापला आणि सोशल मीडियावर त्यानं तो व्यक्त केला.

त्यानं लिहिलं की,'' Emirates Airlineच्या सेवेनं निराश झालो. माझ्याकडे कन्फर्न तिकीट होतं आणि त्यांनी मला विमान फुल झाल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी मला इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करण्यास सांगितले. माझ्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट होतं. आता मी नंतरच्या विमानातून प्रवास करणार आहे. वाईट अनुभव.''   ऑगस्ट 2019मध्ये गेल अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानं भारताविरुद्धच्या त्या सामन्यात त्यानं 42 चेंडूंत 72 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत गेल अव्वल स्थानावर आहे. त्यानं 301 वन डे सामन्यांत 10480 धावा केल्या आहेत. 1999 मध्ये त्यानं भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या नावावर 25 शतकं आणि 54 अर्धशतकं आहेत.

टॅग्स :ख्रिस गेलविमान