Join us

Navdeep Saini : आनंद महिंद्रा यांनी गिफ्ट केलेली 'Mahindra Thar' नवदीप सैनीनं पळवली जंगलात अन् चिखलात!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या सहा युवा खेळाडूंना महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी  'Mahindra Thar' गिफ्ट केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 13:50 IST

Open in App

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या सहा युवा खेळाडूंना महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी  'Mahindra Thar' गिफ्ट केली होती. शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल आणि नवदीप सैनी यांनी त्यासाठी आनंद महिंद्रा यांचे आभारही मानले. टी नटराजननं त्याच्या स्वाक्षरीची जर्सी भेट दिली होती. मंगळवारी भारताचा युवा गोलंदाज नवदीप सैनी ( Navdeep Saini) यानं महिंद्रा थारची टेस्ट ड्राईव्ह केली. त्यानं सोशल मीडियावर २६ सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो Mahindra Thar गाडी खडबडीत रस्त्यावर, चिखलात चालवताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नवदीप सैनीला वन डे व कसोटी संघातून वगळण्यात आले. त्यानं ट्वेंटी-२० संघातील स्थान कायम राखले, परंतु इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकला नाही. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या कसोटी संघातही त्याला संधी दिली गेली नाही. आता भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे आणि वन डे व ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या संघात नवदीप सैनी टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज असू शकतो.  
टॅग्स :आनंद महिंद्राभारतीय क्रिकेट संघ