Join us
Daily Top 2Weekly Top 5

आचरेकर यांच्या निधनाने एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनाने  भारतीय क्रिकेट क्षेत्राला उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 20:16 IST

Open in App

मुंबई : ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनाने  भारतीय क्रिकेट क्षेत्राला उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात,''पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवान्वित झालेल्या आचरेकरसरांचे क्रिकेट प्रशिक्षणातील योगदान असामान्य आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या महान खेळाडूसोबत चंद्रकांत पंडीत, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे आदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना घडविण्यात आचरेकरसरांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी घडविलेल्या अनेक खेळाडूंनी उत्तम प्रशिक्षक म्हणूनही कारकीर्द घडविली आहे.  पुस्तकी तंत्रापेक्षा खेळाडूच्या नैसर्गिक गुणांना पैलू पाडण्याचे त्यांचे तंत्र विशेष होते.''

टॅग्स :रमाकांत आचरेकरसचिन तेंडुलकरदेवेंद्र फडणवीस