Join us

IPL 2023: छोटी बच्ची हो क्या... अनन्या पांडे विराटबद्दल 'ते' वाक्य बोलली अन् झाली तुफान ट्रोल

IPL मध्ये विराट सध्या चांगल्या फॉर्मात आहे पण अनन्याच्या वाक्याने साऱ्यांनाच कमेंट करण्यास भाग पाडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 16:48 IST

Open in App

Virat Kohli Ananya Pandey, IPl 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहली त्याच्या दमदार फॉर्ममध्ये आहे. असे असूनही त्याच्या संघाची कामगिरी मात्र सरासरीची आहे. विराट कोहलीशिवाय या मोसमात फक्त फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनाच आपली छाप सोडता आली आहे. यामुळेच संघाला 8 पैकी केवळ 4 सामने जिंकता आले आहेत तर चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. RCBला त्याच्या चाहत्यांना अपेक्षित असे यश मिळू शकले नसले तरी विराट कोहलीने या मोसमात आतापर्यंत एकूण 5 अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळेच आयपीएलच्या 16व्या हंगामात कोहली ऑरेंज कॅप विजेता बनेल, असे बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेला वाटते.

स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या अनन्याला विचारण्यात आले की यावर्षी ऑरेंज कॅप कोण जिंकेल. यावर अनन्या म्हणाली, 'विराट कोहली यावेळी ऑरेंज कॅप जिंकणार आहे.' अनन्याच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. ऑरेंज कॅप मिळवण्याबाबत विराट कोहलीचे नाव घेणारी अनन्या, केवळ त्याचंच नाव माहिती असल्याने असं बोलली असल्याचे लोक म्हणाले. 

----

--

धावा करण्याच्या बाबतीत विराटचा टॉप-५ मध्ये समावेश

IPL 2023 मध्ये विराट कोहली शानदार फलंदाजी करत आहे. धावांच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मोसमात कोहलीने 8 सामन्यात 142.30 च्या स्ट्राईक रेटने 333 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 5 अर्धशतकांच्या खेळी केल्या आहेत. आयपीएलच्या 16व्या मोसमात कोहलीची नाबाद 82 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच वेळी, आरसीबीचा फाफ डू प्लेसिस चालू हंगामात ऑरेंज कॅपधारक आहे. डुप्लेसिसने या मोसमात 167.46 च्या सरासरीने 422 धावा केल्या आहेत. डू प्लेसिसने या मोसमात आरसीबीसाठी एकूण 5 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 84 आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली ज्या प्रकारचा फॉर्म चालवत आहे, ते पाहता तो ऑरेंज कॅपचा निश्चितच दावेदार होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. विराट कोहलीला शेवटच्या वेळी आयपीएल 2016 मध्ये ऑरेंज कॅप मिळाली होती. IPL 2016 मध्ये विराट कोहलीने 973 धावा केल्या होत्या.

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीअनन्या पांडेबॉलिवूड
Open in App