Join us

पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'

निवृत्ती आधीच नव्या इनिंगची सुरुवात केली, पुजारानं शेअर केली त्यामागची खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 19:30 IST

Open in App

Cheteshwar Pujara Saayss Wife Pooja Pabari Inspires Him For Cricket Commentary : कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या चेतेश्वर पुजारानं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. जवळपास १५ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने टीम इंडियाकडून १०३ कसोटी सामन्यासह ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. खरंतर निवृत्तीची घोषणा करण्याआधीच क्रिकेटमधील नव्या इनिंगची सुरुवात केली होती. २०२४-२५ च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेवेळी तो समालोचकाच्या रुपात दिसला होता. मीडिया आणि कॉमेंट्रीतील ही इनिंग रिटायरमेंटनंतर कायम ठेवणार असल्याची गोष्ट चेतेश्वर पुजाराने बोलून दाखवली आहे. एवढेच नाही ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता. पण पत्नी पूजा पाबरी हिच्यामुळेच या नव्या इंगिचा विचार केला,  ही अनटोल्ड स्टोरीही पुजाराने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितली आहेे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रिटायरमेंटनंतर कॉमेंट्रीमधील इनिंग सुरु ठेवणार 

निवृत्तीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुजाराने क्रिकेट कारकिर्दीत साथ देणाऱ्या सहकाही खेळाडूंसह प्रशिक्षक आणि क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले. यावेळी तो कुटुंबियातील सदस्यांचे आभार मानायलाही विसरला नाही. रिटायरमेंटनंतर कॉमेंट्रीमधील इनिंग सुरु ठेवणार ही गोष्ट सांगितल्यावर इकडे वळण्याचा विचार कधी केलास असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर त्याने शेजारीच बसलेल्या पत्नी पूजा पाबरी हिच्याकडे बोट दाखवत तिनेच यासाठी मला तयार केल्याची अनटोल्ड स्टोरी सांगितली.

Cheteshwar Pujara: सुजला, पण भुजला नाही! वेदना सहन करत केलेली कांगारूंना रडवणारी अविस्मरणीय खेळी (VIDEO)

पत्नी पूजाचं ऐकलं अन् पुजारानं कॉमेंट्री बॉक्समध्ये बसण्याचा निर्णय घेतला मी खूप वर्षे क्रिकेट खेळत आहे. माझ्या या अनुभवाचा वापर मी कॉमेंट्री क्षेत्रात करू शकतो, यासाठी पत्नीकडून प्रेरणा मिळाली, असं म्हणत पुजारानं "आता कसं तू म्हणशील तसं" या तोऱ्यात नव्या इनिंगची सुरुवात केल्याचा किस्सा शेअर केला. तो म्हणाला की, मी खूप वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी या माध्यमातून (कॉमेंट्री) युवा क्रिकेटरसह क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहचवू शकतो. पत्नीकडून प्रेरणा मिळाल्यामुळे याकडे वळलो. आतापर्यंतचा अनुभव चांगला आहे. सनी भाई (सुनील गावसकर) आणि हर्षा भाई (हर्ष भागले) त्यांना खूप वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप काही शिकायला मिळत आहे, असेही तो म्हणाला आहे.

कोण आहे पुजाराची पत्नी?

क्रिकेटर चेतेश्वर पुजाराच्या पत्नीचं नाव पूजा पाबरी असं आहे. अन्य क्रिकेटर्सच्या पत्नी प्रमाणे ती प्रकाश झोतात राहणं पसंत करत नाही. पण  'द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ' या पुस्तकाच्या माध्यमातून ती चांगलीच चर्चेत आली होती. या पुस्तकाच्या माध्यमातून तिने चेतेश्वर पुजाराच्या बालपणीपासून ते सर्वोत्तम कसोटी क्रिकेटर होण्याच्या प्रवासाबद्दलची गोष्ट शेअर केली होती. तिचं हे पुस्तक दोघांच्यातील कमालीची बाँडिंगचा एक खास पुरावाच आहे.

टॅग्स :चेतेश्वर पुजाराभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया