Join us  

IPL 2024: प्ले-ऑफचे सामने मुंबईत होणार नाहीत; 'या' दोन शहरात रंगणार थरार

IPL 2024 Full Schedule: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 4:54 PM

Open in App

IPL 2024: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामातील रविवारपर्यंत पाच सामने पार पडले आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले नाही. केवळ पहिल्या टप्प्यातील अर्थात पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. (IPL 2024 News) हे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नव्हत्या. त्यामुळे लवकरच आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक जाहीर केले जाईल. अशातच आयपीएलच्या प्ले-ऑफच्या सामन्यांबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएलचे 'करा किंवा मरा'चे सामने अर्थात नॉक आऊटच्या लढतींना २१ मे पासून सुरुवात होणार आहे. (IPL 2024 Schedule) 

क्वालिफायर १ चा सामना २१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर एलिमिनेटरचा सामना याच मैदानात २२ मे रोजी होईल. क्वालिफायर २ चा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर २४ मे रोजी पार पडेल. तसेच अंतिम सामना २६ मे रोजी याच मैदानावर खेळवला जाईल, अशी माहिती 'क्रिकबज'ने दिली. आयपीएलने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. 

IPL चे पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक 

  1. २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  2. २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
  3. २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
  4. २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
  5. २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  6. २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  7. २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  8. २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  9. २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  10. २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  11. ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
  12. ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
  13. ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  14. १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  15. २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  16. ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  17. ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  18. ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
  19. ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
  20. ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
टॅग्स :आयपीएल २०२४नरेंद्र मोदी स्टेडियमचेन्नईअहमदाबादमुंबई