Join us  

६ वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर; CSKच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या फलंदाजाची तीन सामन्यांत दोन शतकं 

चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ व्या पर्वात साजेशी कामगिरी करता आली नाही. यूएईत झालेल्या आयपीएल २०२० ( IPL 2020) CSKला आठव्या क्रमांकावर रहावे लागले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 24, 2021 3:52 PM

Open in App
ठळक मुद्देआयपीएल २०२०त चेन्नई सुपर किंग्सची निराशाजनक कामगिरीआयपीएल २०२१साठी के गौतमसाठी मोजले ९ कोटी रुपयेराजस्थान रॉयल्सकडून ट्रेंड केलेला खेळाडू गाजवतोय मैदान

चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ व्या पर्वात साजेशी कामगिरी करता आली नाही. यूएईत झालेल्या आयपीएल २०२० ( IPL 2020) CSKला आठव्या क्रमांकावर रहावे लागले. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSKला प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. त्यामुळेच आयपीएल २०२१साठी झालेल्या लिलावापूर्वी चेन्नईनं कोलकाता नाइट रायडर्सना ( Kolkata Knight Riders) जेतेपद जिंकून देणाऱ्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत या खेळाडूनं हवा केली आहे. त्यानं तीन सामन्यांत दोन शतकं झळकावली आहेत. आठ फ्रँचायझींनी ५७ खेळाडूंसाठी मोजले १४५.३० कोटी; एका क्लिकवर समजून घ्या हे गणित!

CSKनं लिलावापूर्वी BCCIकडे रिलीज व रिटेन खेळाडूची यादी सोपवली, त्याचवेळी त्यांनी अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाला ( Robin Uthappa) आपल्या ताफ्यात घेतते. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या उथप्पाला यूएईत समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे चेन्नईनं त्याला ट्रेंड करताच सर्वांना आश्चर्य व्यक्त केलं होतं. पण, विजय हजारे ट्रॉफीत केरळकडून खेळताना उथप्पानं सर्वांची बोलती बंद केली. लिलावाची सांगता, जाणून घ्या ८ फ्रँचायझींच्या खेळाडूंची संपूर्ण यादी!

उथप्पानं बुधवारी रेल्वे संघाविरुद्ध १०४ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकार खेचून १०० धावा कुटल्या. त्याच्यासोबत विष्णू विनोदनेही १०७ धावा चोपल्या. या दोघांच्या शतकाच्या जोरावर केरळनं ५० षटकांत ६ बाद ३५१ धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीच्या या पर्वातील उथप्पाचा हा तिसरा सामना आहे. त्यानं ओडिसाविरुद्ध १०७ धावा केल्या, तर उत्तर प्रदेशविरुद्ध ८१ धावा केल्या. उथप्पा ६ वर्षांपासून टीम इंडियाबाहेर आहे. १४ जुलै २०१५ मध्ये त्यानं झिम्बाब्वेविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.  विराट कोहलीचा नेट्समध्ये सुरू होता 'अतरंगी' सराव, नेटिझन्सना आठवला स्टीव्ह स्मिथ, Video

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन, रॉबिन उथप्पा.  

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- मोईन अली ( Moeen Ali) ७ कोटी, के गौतम ( K Gowtham) ९.२५ कोटी, चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujra) ५० लाख, हरिशंकर रेड्डी ( Harishankar Reddy) २० लाख, भगत वर्मा ( Bhagath Varma) २० लाख, हरि निशांत (Hari Nishanth) २० लाख.

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सआयपीएल