Join us

IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

IPL Trading Deal म्हणजे नेमकं काय? नियम काय सांगतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:31 IST

Open in App

Chennai Super Kings and Rajasthan Royals discuss a potential Ravindra Jadeja-Sanju Samson Swap Know About IPL Trade Rules : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात IPL च्या इतिहासातील खेळाडूंच्या अदलाबदलीची मोठी डील होणार असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने संजू सॅमसनला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी रवींद्र जडेजाला ट्रेडिंग डील अंतर्गत स्वॅप करण्याची तयारी दर्शवल्याचेही बोलले जात आहे. खरंच ही डील होणार का? काय आहे IPL मधील ट्रेड डील संदर्भात नियम जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

IPL Trading Deal म्हणजे नेमकं काय? नियम काय सांगतो?

IPL Trading Window च्या माध्यमातून फ्रँचायझी संघाला आपल्या संघातील एखाद्या खेळाडूच्या बदल्यात दुसऱ्या फ्रँचायझी संघातील खेळाडू घेण्याची मुभा दिली जाते. ज्याला ट्रेड असं म्हणतात. ही डील खेळाडूच्या बदल्यात खेळाडू किंवा आर्थिक रक्कमेच्या स्वरुपातही पूर्ण केली जाऊ शकते. याचा अर्थ एखादा फ्रँचायझी संघ दुसऱ्या फ्रँचायझी संघातील खेळाडू घेतल्यावर आपल्या ताफ्यातील खेळाडू न देता त्याच्या बदली पैशाच्या स्वरुपात किंमत मोजून ही डील पूर्ण करु शकतो. 

जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं

ट्रेडचे दोन प्रमुख प्रकार

  • अनकॅप्ड प्लेयर (आंतरारष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू) 
  • कॅप्ड प्लेयर (आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू)

जाणून घ्या IPL Trading Deal संदर्भातील नियम

  • ट्रेड कोणत्याही प्रकारातील खेळाडूसंदर्भात असू देत. ही डील तेव्हाच शक्य होते ज्यावेळी दोन्ही संघांची संमती असते. एवढेच नाही तर खेळाडूलाही ते मान्य असावे लागते. जर यातील एकाचा जरी नकार असेल तर ही डील शक्य होत नाही.
  • IPL Trading Window ठराविक काळासाठी उपलब्ध असते. याच कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ती वेळ निघून गेली की, फ्रँचायझीला हा डाव खेळता येत नाही. 
  • सॅलरी कॅपही मिळती जुळती असावी लागते. एवढेच नाही तर किमान १८ आणि अधिकाधिक २५ खेळाडू संघात घेण्याची मर्यादा जपून ही डील करण्याचा नियमही पाळावा लागतो. 
  • दोन्ही फ्रँचायझी आणि खेळाडू या डीलसाठी राजी झाल्यावर BCCI ला त्याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर ४८ तासांत यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जातो.   
English
हिंदी सारांश
Web Title : IPL Trade: Will Samson and Jadeja Swap? Rules Explained.

Web Summary : IPL buzz: Jadeja-Samson swap deal possible? Trade involves player exchange or monetary compensation during the trading window. Consent from teams, players, and BCCI is essential, respecting salary caps and squad limits.
टॅग्स :आयपीएल २०२४आयपीएल लिलावरवींद्र जडेजासंजू सॅमसनराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्स