चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाकडे आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिकण्याची संधी आहे. यातच, स्टार क्रिकेटर विराट कोहलीने देखील विजयाचा नंबर गेम समजावून सांगितला आहे. जर विराटने सांगितल्या प्रमाणे घडले, तर टीम इंडियासाठी ट्रॉफी पक्की होऊ शकते. विराट म्हणाला या स्पर्धेत जबरदस्त उत्साह बघायला मिळणार आहे. दरम्यान त्याने एक लकी सामनाही सांगितला. हा सामना जिंकल्यानंतर, भारतासाठी संपूर्ण टोर्नामेंट छान पद्धतीने जाऊ शकते, असे त्याचे म्हणणे आहे.
8 संघ घेणार भाग - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ८ संघ सहभागी होत आहेत. यात ग्रुप 'ए' मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचे संघ आहेत. टीम इंडिया २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तत्पूर्वी, विराट कोहलीने स्टार स्पोर्ट्सवर मुलाखत दिली आहे. यावेळी तो म्हणाला, या स्पर्धेत आठही संघांना पहिल्या सामन्यापासूनच सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 नंतर, पहिल्यांदाच खेळली जात आहे. तेव्हा पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता.
काय म्हणाला विराट? -मुलाखतीत विराट कोहली म्हणाला, 'ही स्पर्धा बऱ्याच दिवसांनंतर होत आहे. ही स्पर्धा मला नेहमीच आवडत होती. या टोर्नामेंटमध्ये पात्र होण्यासाठी तुम्हाला पहिल्या आठमध्ये असणे आवश्यक असते. पहिल्या सामन्यापासूनच तुम्हाला तुमची सर्वोत्तम कामगिरी करावी लागते.
असा आहे विजयाचा नंबर गेम? -विराट पुढे म्हणाला, 'आयसीसी टोर्नामेंटमध्ये आमचा पहिला सामना जेव्हा जेव्हा बांगलादेशविरुद्ध होतो, तेव्हा तेव्हा संपूर्ण टोर्नामेंटच आमच्यासाठी चांगले जाते. आम्ही २०११ च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध खेळलो आणि ट्रॉफी जिंकली. कोहली २००९, २०१३ (जेव्हा भारत चॅम्पियन झाला) आणि २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला आहे.