चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाक स्टेडियममध्ये का नाही दिसला तिरंगा? पाक क्रिकेट बोर्डानं दिलं स्पष्टीकरण

कळीचा मुद्दा ठरत असलेल्या मुद्यावर पाक क्रिकेट बोर्डाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 19:12 IST2025-02-17T19:06:03+5:302025-02-17T19:12:02+5:30

whatsapp join usJoin us
Champions Trophy 2025 Pakistan Cricket Board Breaks Silence On No Indian Flag In Karachi Stadium | चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाक स्टेडियममध्ये का नाही दिसला तिरंगा? पाक क्रिकेट बोर्डानं दिलं स्पष्टीकरण

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाक स्टेडियममध्ये का नाही दिसला तिरंगा? पाक क्रिकेट बोर्डानं दिलं स्पष्टीकरण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PCB Breaks Silence On Indian Flag Controversy : पाकिस्तान  यजमानपद भूषवत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लढतीने स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. हा सामना कराची येथील नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी पाकिस्तानमधील स्टेडियममध्ये स्पर्धेत सहभागी देशांचे ध्वज लावण्यात आले आहेत. पण यात भारतीय ध्वज मात्र दिसत नाही. यावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यावर स्पष्टीकरण दिले आहे.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हायब्रिड मॉडेलचा दाखला देत पाक बोर्डानं केला बचाव

कराची नॅशनल स्टेडियमवरून भारतीय राष्ट्रध्वज का नाही? हा प्रश्न स्पर्धेआधी कळीचा मुद्दा ठरत असतान पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यावर आपली भूमिका स्पष्ट केलीये. सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय संघानं पाकिस्तानात जाऊन सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी भारतीय संघाचे सर्व सामने दुबई घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवली जात आहे. याचाच दाखला पाकिस्तानने आपली बाजू मांडण्यासाठी दिल्याचे दिसून येते.
 
भारतीय तिरंगा का फडकला नाही? पाक क्रिकेट बोर्डानं काय म्हटलं?

पाकिस्तान बोर्डाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येणार नाही. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईच्या मैदानात रंगणार आहेत. लाहोर येथील गद्दाफी स्टेडियम आणि कराचीतील नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर जे संघ मॅचेस खेळणार आहेत, त्या देशाचे राष्ट्रध्वज लावण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील वेगवेगळ्या देशांचे सामने वेगवेगळ्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. त्यानुसार त्या त्या मैदानात खेळणाऱ्या देशाचे राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहेत.  या मुद्यावरुन नाहक वाद निर्माण करण्यात येत आहे, असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये झळकलं रोहितच बॅनर

राष्ट्रध्वजावरुन रंगणाऱ्या चर्चेदरम्यान एक अशीही गोष्ट समोर आली होती की, लाहोर, रावळपिंडी आणि कराची येथील स्टेडियममध्ये स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्वच्या सर्व संघाच्या कर्णधारांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. यात रोहित शर्माच्या बॅनरचाही समावेश  आहे.
 

Web Title: Champions Trophy 2025 Pakistan Cricket Board Breaks Silence On No Indian Flag In Karachi Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.