Pakistan Champions Trophy Squad : पाकनं टीम इंडियाविरुद्ध सेंच्युरी ठोकणाऱ्या 'चॅम्पियन'वर खेळला डाव

कोण आहे तो ज्यानं गत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाविरुद्ध ठोकली होती सेंच्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 20:23 IST2025-01-31T20:21:58+5:302025-01-31T20:23:09+5:30

whatsapp join usJoin us
Champions Trophy 2025 Pakistan Announced Squad Fakhar Zaman Faheem Ashraf Recalled In Team | Pakistan Champions Trophy Squad : पाकनं टीम इंडियाविरुद्ध सेंच्युरी ठोकणाऱ्या 'चॅम्पियन'वर खेळला डाव

Pakistan Champions Trophy Squad : पाकनं टीम इंडियाविरुद्ध सेंच्युरी ठोकणाऱ्या 'चॅम्पियन'वर खेळला डाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan Champions Trophy Squad  : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद मिरवणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ८ संघ सहभागी आहेत. अन्य सर्व संघांनी संघ बांधणी केल्यावर पाकिस्तानने सर्वात शेवटी या स्पर्धेसाठी आपली मोर्चे बांधणी केल्याचे पाहायला मिळाले. आगामी स्पर्धेसाठी गत चॅम्पियन पाकिस्तान संघाने टीम इंडियाविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या हिरोसह चार अनुभवी खेळाडूंसाठी पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाचे दरवाजे उघडले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कोण आहे तो ज्यानं गत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाविरुद्ध ठोकली होती सेंच्युरी

याआधी २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झाली होती. पाकिस्तानच्या संघाने फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत करुन जेतेपद पटकावले होते. या सामन्यात फखर झमान याने शतकी खेळी केली होती. तो बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तान संघाबाहेर आहे. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची 'घरवापसी' झालीये. या अनुभवी खेळाडूशिवाय पाकने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघात फहीम अशरफ, खुशदिल शाह आणि साउद शकील यांनाही संघात स्थान दिले आहे. बाबर आझमसह आणि फखर झमानसह फहीम हा देखील गत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाचा भाग होता.   

चॅम्पियन्स ट्रॉफी आधी तिरंगी मालिका

पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी आपल्या घरच्या मैदानात तिरंगी मालिका खेळणार आहे. या मालिकेत पाकशिवाय न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश असेल. ही मालिका ८ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जो संघ निवडला आहे तोच य या मालिकेतही खेळेल. पाकिस्तान कोणत्या रणनितीनं मैदानात उतरणार ते या मालिकेत पाहायला मिळू शकते.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसह घरच्या मैदानातील  तिरंगी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ 

बाबर आझम, फखर झमान, कामरान गुलाम, साऊद शकील, तैयब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा (उप कर्णधार), मोहम्मद रिझवान (कर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हॅरिस राउफ, मोहम्मद हस्नेन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.

Web Title: Champions Trophy 2025 Pakistan Announced Squad Fakhar Zaman Faheem Ashraf Recalled In Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.