ICC Champions Trophy Opening Ceremony : पाकिस्तान आणि दुबईमध्ये फेब्रुवारी ते मार्च दरम्यान रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी उद्घाटन समारंभ सोहळ्याचा कार्यक्रम होणार का? या प्रश्नाच उत्तर संभ्रमित करणारे आहे. यामागचं कारण वेगवेगळ्या वृत्तामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उद्घाटन समारंभासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. याशिवाय जर कार्यक्रमाचं आयोजन झालं तर भारतीय संघाचा कॅप्टनस कार्यक्रमात सहभागी होणार का? हा देखील अनेकांना पडललेला मोठा प्रश्न आहे. एक नजर टाकुयात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासंदर्भात समोर येणाऱ्या माहितीवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उद्घाटन सोहळ्यात पारंपारिक थाट दिसणं 'मुश्किल'
पाकिस्तानमधील 'द डॉन' या वृत्तपत्राने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम थाटात होणार नाही, असा दावा केला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेसाठी उशीरा पाकिस्तानमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे उद्घाटन सोहळाच नव्हे तर सहभागी आठ संघासाठी सराव सामन्याचं नियोजनही शक्य होणार नाही. असा उल्लेख या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. इंग्लंडचा संघ १८ फेब्रुवारीला तर ऑस्ट्रेलियन संघ २२ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये पोहचणार आहे. सहभागी संघाच्या कॅप्टन्सच्या उपस्थितीत पारंपारिक तोऱ्यात कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य नसले तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या परीनं कार्यक्रमाचं नियोजन पार पाडण्यावर भर देणार आहे.
तारीख ठरली! कार्यक्रमासाठी PCB अध्यक्षांनीही दिली मंजूरी
पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने १६ फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करणार आहे. हा कार्यक्रम लाहोरमध्ये नियोजित आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी या कार्यक्रमाला मंजूरी दिल्याचेही या वृत्तामध्ये म्हटले आहे.
कधी अन् कुठं पार पडणार उद्घाटन सोहळा? रोहित शर्मा सहभागी होणार का?
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी स्पर्धेतील सहभागी संघाच्या पत्रकार परिषदेसह फोटोशूटसंदर्भातील कार्यक्रमावरही चर्चा करत आहे. १६ फेब्रुवारीला लाहोरमध्ये ते पार पाडण्याचा विचार आहे. उद्घाटन समारभांचा कार्यक्रम लाहोरमधील ऐतिहासिक हुजूरी बाग किल्लावर पार पडणार आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आणि दिग्गज खेळाडंना आमंत्रित करण्यात येईल. कर्णधारांची पत्रकार परिषद आणि फोटोशूटसाठी रोहित शर्मा पाकिस्तामधील लाहोरला भेट देणार का? याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किंवा आयसीसीने त्याच्या उपस्थितीतीसंदर्भात कोणतीही पुष्टी दिलेली नाही.