शानदार शमी! पहिल्याच ओव्हरमध्ये 'सरकार' गडबडले! सौम्य 'एज' अन् सौम्या शून्यावर माघारी

पहिल्या षटकात पहिली विकेट! शमीनं भारतीय संघाला करुन दिली दमदार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:00 IST2025-02-20T14:58:49+5:302025-02-20T15:00:15+5:30

whatsapp join usJoin us
Champions Trophy 2025 India vs Bangladesh 2nd Match Mohammed Shami strikes in the first over and Soumya Sarkar goes for Duck | शानदार शमी! पहिल्याच ओव्हरमध्ये 'सरकार' गडबडले! सौम्य 'एज' अन् सौम्या शून्यावर माघारी

शानदार शमी! पहिल्याच ओव्हरमध्ये 'सरकार' गडबडले! सौम्य 'एज' अन् सौम्या शून्यावर माघारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारतीय संघाविरुद्धच्या आपल्या सलामीच्या लढतीत बांगलादेशच्या संघानं टॉस जिंकला. फलंदाजांसाठी अनुकूल वाटणाऱ्या सपाट खेळपट्टीवर त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण मोहम्मद शमीनं पहिल्याच षटकात त्यांचा हा निर्णय फोल ठरवला. पहिल्याच षटकात त्याने बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकारला तंबूचा रस्ता दाखवत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. 

शमीसमोर सौम्या सरकार गडबडला 

टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना तांझिद हसन आणि सौम्या सरकार या जोडीनं बांगलादेशच्या डावाची सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला भारतीय संघाकडून मोहम्मद शमी पहिल षटक घेऊन आला. शमीच्या पहिल्याच चेंडूवर तंझिद हसन याने एका धावेसह संघाचे आणि आपले खाते उघडले. पण त्यानंतर स्ट्राइकवर आलेल्या सौम्या सरकार हा शमीचा सामना करताना चांगलाच संघर्ष करताना दिसला.

पहिल्या बॉलवर सिंगल दिली अन् शेवटच्या बॉसवर विकेट घेतली

शेवटी अखेरच्या षटकावर तो फसला अन् यष्टीरक्षक लोकेश राहुलकडे झेल देऊन त्याने तंबूचा रस्ता धरला. ५ चेंडू खेळून तो शून्यावर बाद झाला. शमीनं पहिल्या षटकात एक धाव देऊन एक विकेटही मिळवून दिली. शमीच्या फिटनेसवर सर्वांच्या नजरा असताना त्याने संघाला करून दिलेली शानदार सुरुवात टीम इंडियासाठी शमी हिट होण्यासाठी फिट आहे, असे संकेत देणाराच आहे.

Web Title: Champions Trophy 2025 India vs Bangladesh 2nd Match Mohammed Shami strikes in the first over and Soumya Sarkar goes for Duck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.