कुलदीपचा कल्ला! काही कळायच्या आत चेंडू वळला अन् रचिनचा त्रिफळा उडला; केनचाही करेक्ट कार्यक्रम

वरुण चक्रवर्तीनं सलामी जोडी फोडल्यावर कुलदीप यादवनं केलेला कहर हा न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलणारा होता. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 15:58 IST2025-03-09T15:51:52+5:302025-03-09T15:58:06+5:30

whatsapp join usJoin us
Champions Trophy 2025 IND vs NZ What A Spell By Kuldeep Yadav In The Champions Trophy Final Get Both Rachin Ravindra And Kane Williamson Watch | कुलदीपचा कल्ला! काही कळायच्या आत चेंडू वळला अन् रचिनचा त्रिफळा उडला; केनचाही करेक्ट कार्यक्रम

कुलदीपचा कल्ला! काही कळायच्या आत चेंडू वळला अन् रचिनचा त्रिफळा उडला; केनचाही करेक्ट कार्यक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Champions Trophy 2025 IND vs NZ Final : दुबईच्या मैदानात रंगलेल्या फायनल मॅचमध्ये कुलदीप यादवनं आपल्या स्पेलची सुरुवात जबरदस्त आणि मोठ्या विकेट्सह केली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दोन शतकासह अनेक विक्रम रचणाऱ्या रचिन रवीद्रला त्याने क्लीन बोल्ड केले. एवढ्यावरच तो थांबला नाही. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खंडीभर धावा करणाऱ्या केन विल्यमसनलाही कुलदीपनं आपल्या दुसऱ्या षटकात जाळ्यात अडकवत टीम इंडियाला तिसरी विकेट मिळवून दिली. वरुण चक्रवर्तीनं सलामी जोडी फोडल्यावर कुलदीप यादवनं केलेला कहर हा न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलणारा होता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

काही कळायच्या आधी चेंडू वळला अन् रचिनचा त्रिफळा उडला

पहिल्यांदा बॅटिंग करताना न्यूझीलंडच्या संघानं १० षटकानंतर धावफलकावर एका विकेट्सच्या मोबदल्यात ६९ धावा लावल्या होत्या. वरुण चक्रवर्तीचा चेंडू वळतोय हे लक्षात येताच रोहित शर्मानं चेंडू कुलदीप यादवच्या हाती सोपवला. ११ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कुलदीप यादवनं न्यूझीलंडच्या ताफ्यातील तगड्या फॉर्ममध्ये असलेल्या रचिनला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले. चेंडू पडल्यावर तो कळण्याआधी रचिन रवींद्रचा त्रिफळा उडला होता. रचिन २९ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३७ धावा करून तंबूत परतला. या पठ्ठ्यानं  यंदाच्या हंगामात दोन शतके झळकावली आहेत. पण याआधीच्या सामन्याप्रमाणे यावेळीही तो भारतीय संघाविरुद्ध दमदार खेळी करण्यात अपयशी ठरलाय कुलदीपला मिळालेले हे यश न्यूझीलंडला मोठा धक्का अन् टीम इंडियाला मोठा दिलासा देणारे होते. 

केन विल्यमसनही सापडला जाळ्यात, कुलदीपनं स्वत:च्या गोलंदाजीवर घेतला कॅच

दोन विकेट पडल्यावर केन विल्यमसनवर मोठी जबाबदारी होती. पण कुलदीप पुन्हा दुसरं षटक घेऊन आला अन् या षटकात त्याने केन विल्यमसनलाही तंबूचा रस्ता दाखवला. आपल्याच गोलंदाजीवर एक सोपा झेल घेत त्याने केनचा करेक्ट कार्यक्रम केला. १३ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केन विल्यमसन एका चौकाराच्या मदतीने १४ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला.

Web Title: Champions Trophy 2025 IND vs NZ What A Spell By Kuldeep Yadav In The Champions Trophy Final Get Both Rachin Ravindra And Kane Williamson Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.