चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमी पुन्हा एकदा आपल्या जुन्या तोऱ्यात गोलंदाजी करताना दिसला. पहिल्या षटकात सौमय्या सरकारच्या (Soumya Sarkar) रुपात भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिल्यावर शमीनं मेहदी हसन मिराझच्या (Mehidy Hasan Miraz) च्या रुपात या सामन्यात आपल्या खात्यात दुसरी विकेट जमा केली. तो इथंच थांबला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०० पैकी आयसीसी स्पर्धेत घेतल्यात ५८ विकेट्स
बांगलादेशच्या आघाडीला सुरुंग लावल्यावर तौहीद हृदोय (Towhid Hridoy) आणि जाकर अली (Jaker Ali) ही सेट झालेली जोडीही शमीनंच फोजली. जाकर अलीच्या रुपात तिसरी विकेट घेताच शमीनं वनडेत २०० विकेट्सचा पल्ला गाठला. वनडेत सर्वात जलदगतीने हा पल्ला गाठणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापैकी ५८ विकेट्स त्याने आयसीसीच्या स्पर्धेत घेतल्या आहेत.
जलदगतीने २०० विकेट्स मिळवणारा भारतीय; क्रिकेट जगतात लागतो त्याचा दुसरा नंबर
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेट्स घेण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन मिचेल स्टार्कच्या नावे आहे. त्याने १०२ सामन्यातील १०२ डावात २०० विकेट्स घेतल्या होत्या. मोहम्मद शमीनं १०३ डावात हा पल्ला गाठला. या दोघांच्या पाठोपाठ या यादीत पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताकचा नंबर लागतो त्याने १०४ डावात २०० विकेट्सपर्यंत मजल मारली होती.
वनडेत जलगतीने २०० विकेट्स घेणारे गोलंदाज
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)- १०२ डावात २०० विकेट्समोहम्मद शमी (भारत) - १०३ डावात २०० विकेट्ससकलेन मुश्ताक (पाकिस्तान) - १०४ डावात २०० विकेट्सट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) १०७ डावात २०० विकेट्सब्रेट ली (ऑस्ट्रेलिया)- ११२ डावात २०० विकेट्स