"त्याच्यासाठी सोपी गोष्ट...!" चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गेलचा विक्रम मोडणार विराट कोहली? गेलनं स्वतःच केली भविष्यवाणी

गेल म्हणाला, ‘‘फॉर्म कसाही असो तो (विराट कोहली) अजूनही जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. आकडे याचा पुरावा आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 00:09 IST2025-02-12T00:08:46+5:302025-02-12T00:09:46+5:30

whatsapp join usJoin us
Champions Trophy 2025 chris gayle predicts virat kohli will break his most champions trophy runs record | "त्याच्यासाठी सोपी गोष्ट...!" चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गेलचा विक्रम मोडणार विराट कोहली? गेलनं स्वतःच केली भविष्यवाणी

"त्याच्यासाठी सोपी गोष्ट...!" चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गेलचा विक्रम मोडणार विराट कोहली? गेलनं स्वतःच केली भविष्यवाणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विराट कोहलीचा फॉर्म कसाही असो, तो अजूनही जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. आपला चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडणे, ही त्याच्यासाठी अत्यंत सोपी गोष्ट आहे, असे वेस्टइंडीजचा माजी तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने म्हटले आहे. तो दिल्लीत पत्रकारांसोबत बोलत होता. खरे तर, कोहलीला गेल्या काही दिवसांपासून धावांसाठी झगडावे लागत आहे. 

कोहली अजूनही जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज -
गेल म्हणाला, ‘‘फॉर्म कसाही असो तो (विराट कोहली) अजूनही जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. आकडे याचा पुरावा आहेत. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये किती शतके ठोकली आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आम्ही सर्वच क्रिकेटर अशा पद्धतीच्या काळातून जात असतो. मला माहीत आहे की, तो आपल्या करिअरच्या अखेरच्या टप्प्यात आहे. मात्र असे होत असते. त्याला स्वतःवर विश्वास ठेऊन फॉर्म मिळवावा लागेल.’’

विक्रम मोडणे त्याच्यासाठी सोपी गोष्ट - 
यावेळी, कोहली (529) चॅम्पियन्स ट्रॉफीतील तुझा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडू शकेल का? असा प्रश्न केला असता, गेल (791) म्हणाला, ‘‘त्याच्यासाठी ही फार सोपी गोष्ट आहे. कारण तो यापासून केळ 200 धावाच दूर आहे. तो किती सामने खेळेल हे मला माहीत नाही. मात्र मला पूर्ण विश्वास आहे की, तो 200 हून अधिक धावा करेल.’’ 

रोहित शर्माने वनडेमध्ये षटकार ठोकण्याच्या बाबतीत गेलला मागे टाकले आहे. यानंतर गेलने त्याचे अभिनंदन करत, त्याला षटकारांचा नवा राजा म्हटले आहे. रोहित वनडे सामन्यांत सर्वाधिक षटकार ठोकणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी पहिल्या क्रमांकावर आहे.   
 

Web Title: Champions Trophy 2025 chris gayle predicts virat kohli will break his most champions trophy runs record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.