Join us

'हिटमॅन' रोहितने छोटेखानी खेळीसह साधला मोठा डाव, जलदगतीनं ११,००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला दुसरा

वनडेत सर्वात जलदगतीने ११ हजार धावा करणारा तो क्रिकेट जगतातील दुसरा खेळाडू ठरलाय.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 20:04 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मानं छोट्याखानी खेळीत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बांगलादेशच्या संघानं सेट केलेल्या २२९ धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ३६ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने ४ चौकार मारले. या सामन्यात अर्धशतकाची संधी हुकली असली तरी ११ हजार धावांचा पल्ला गाठताना खास विक्रम त्याने आपल्या नावे केलाय. वनडेत सर्वात जलदगतीने ११ हजार धावा करणारा तो क्रिकेट जगतातील दुसरा खेळाडू ठरलाय.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रोहित शर्माची खास कामगिरी, सचिन, सौरवसह विराटच्या पक्तींत एन्ट्री

दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात रोहित शर्मानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावसंख्याचे पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा भारताचा तो चौथा आणि एकंदरीत क्रिकेट जगतातील १० खेळाडू ठरला. भारतीय संघाच्या कर्णधाराने सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि सौरव गांगुलीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे.  

सर्वात जलदगतीने ११ हजार धावांचा पल्ला गाठणारा दुसरा फलंदाज ठरला रोहित, टॉपर कोण?

रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने ११ हजार धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. हिटमॅन रोहितनं २६१ व्या डावात हा पल्ला गाठला आहे. या यादीत किंग कोहली अव्वलस्थानावर आहे. विराट कोहलीनं हा पल्ला गाठण्यासाठी २२२ वेळा बॅटिंग केली होती. म्हणजेच २२२ डावात हा पल्ला गाठला होता. 

वनडेत ११ हजार धावांचा पल्ला पार करणारे भारतीय फलंदाज

  • सचिन तेंडुलकर - ४५२ डावात १८,४२६ धावा
  • विराट कोहली - २८५ डावांमध्ये १३,९६३ धावा
  • सौरव गांगुली - ३११ डावांमध्ये ११३६३ धावा
  • रोहित शर्मा - २६१ डावांमध्ये ११,०२९ धावा
टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध बांगलादेशचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५