AFG vs SA : करामती खानची फिल्डिंगमध्ये कमाल; शतकवीराला Run Out करत दाखवलं 'मॅजिक' (VIDEO)

दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर आउट होण्याच्या मूडमध्येच नव्हता, सारे गोलंदाज थकले त्याला चकवा द्यायला राशिदलाही नाही जमले, मग करामती खाननं रन आउटच्या रुपात साधला डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:10 IST2025-02-21T17:56:18+5:302025-02-21T18:10:00+5:30

whatsapp join usJoin us
Champions Trophy 2025 Afghanistan vs South Africa Match Rashid Khan's Magical Fielding Dismissed Centurion Ryan Rickelton Watch Video | AFG vs SA : करामती खानची फिल्डिंगमध्ये कमाल; शतकवीराला Run Out करत दाखवलं 'मॅजिक' (VIDEO)

AFG vs SA : करामती खानची फिल्डिंगमध्ये कमाल; शतकवीराला Run Out करत दाखवलं 'मॅजिक' (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 'ब' गटातील पहिली लढत रंगली आहे. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. आयपीएलमील २३ कोटीच्या गडी दुखापतीमुळे बाहेर बसल्यामुळे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडूनरायन रिकल्टनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. अवघ्या ७ वनडे सामन्याचा अनुभव असलेल्या या पठ्ठ्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात दमदार शतक झळकावले. वनडे कारकिर्दीतील त्याचे हे पहिले शतक ठरले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

राशिद खानची कमालीची फिल्डिंग; शतकवीर सलामीवीराच्या खेळीला ब्रेक 

रायन रिकल्टन हा कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळाले. ना जलदगती गोलंदाज त्याला अडचणीत आणू शकले ना फिरकीपटू त्याला चकवा देण्यात यशस्वी ठरले. अफगाणिस्तानच्या ताफ्यातील गोलंदाजांना त्याची विकेट घेणं जवळपास मुश्किल झालं होते. या परिस्थितीत करामती खान अर्थात राशिद खान संघाच्या मदतीला धावून आला. आपल्या गोलंदाजीवर चपळाईनं क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत शतकवीर रायन रिकल्टनला रन आउट केले. दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरानं १०६ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली. 

नेमकं काय घडलं? इथं पहा व्हिडिओ

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ३६ व्या षटकात राशीद खान गोलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूला रायय रिकल्टन स्ट्राइक वर होता. राशिद खानच्या गोलंदाजीवर रायन रिकल्टन याने पुढे येऊन थेट गोलंदाजाच्या दिशेनं फटका मारला. राशीद खानने वेगानं आलेला चेंडू तेवढ्याच वेगान पकडत पुन्हा तो विकेटकिपर गुरबाझच्या दिशेनं फेकला. दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरानं क्रिजमध्ये परतण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले. बॅट क्रिजच्या आत आली. पण ती हवेत राहिली अन् तिसऱ्या पंचांनी तो रन आउट असल्याचा निर्णय दिला. गोलंदाजांना विकेट मिळत नसताना राशीद खाननं फिल्डिंगमध्ये जादूई अंदाजात संघाला महत्त्वाचं यश मिळवून दिले. 

Web Title: Champions Trophy 2025 Afghanistan vs South Africa Match Rashid Khan's Magical Fielding Dismissed Centurion Ryan Rickelton Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.