Join us

आयपीएलद्वारे आव्हानात्मक सरावाची संधी - इयान चॅपेल

नवी दिल्ली : ‘कोरोना महामारीदरम्यान मिळणारी खेळण्याची संधी खूप वेगळी असेल. मात्र आगामी आयपीएलद्वारे भारतीय व आॅस्टेÑलियन खेळाडूंना फायदा ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 00:24 IST

Open in App

नवी दिल्ली : ‘कोरोना महामारीदरम्यान मिळणारी खेळण्याची संधी खूप वेगळी असेल. मात्र आगामी आयपीएलद्वारे भारतीय व आॅस्टेÑलियन खेळाडूंना फायदा होईल. कारण, या वर्षाच्या अखेरीस या दोन देशांमध्ये होणाऱ्या मालिकेआधी या दोन्ही संघाच्या खेळाडूंना आव्हानात्मक स्पर्धेतून सरावाची संधी मिळेल,’ असे मत आॅस्टेÑलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले.१० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर यूएईतूनच भारतीय संघ आॅस्टेÑलियाला जाईल.चॅपेल म्हणाले की, ‘भारतीय खेळाडू व काही आॅस्टेÑलियन खेळाडूंचा विचार केल्यास त्यांच्यासाठी यंदाची आयपीएल महत्त्वाची ठरेल. कारण या स्पर्धेद्वारे त्यांना आव्हानात्मक क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल.’ त्याच प्रमाणे, ‘भारतीय संघ आॅस्टेÑलिया दौºयात कोणतीही कसर न ठेवता बॉर्डर-गावसकर चषकाकडे जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि वैयक्तिक सन्मानाच्या दृष्टीने पाहतील, असेही चॅपेल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आॅस्ट्रेलिया