Join us

भारतीय महिलांपुढे मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान

आज रंगणार इंग्लंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 07:58 IST

Open in App
ठळक मुद्देमाजी भारतीय क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांच्यानुसार, संघातील अनेक खेळाडू मधल्या फळीत संघाचा डाव सावरण्यास सक्षम आहेत. अशा परिस्थितीत युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जला तिसऱ्या स्थानावर खेळविण्यात येऊ शकेल

टॉन्टन : पहिला एकदिवसीय सामना मोठ्या फरकाने गमावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्याच्या निर्धाराने इंग्लंडविरुद्ध बुधवारी खेळेल. भारतीय संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने नमवले होते.पाहिल्या सामन्यात भारतीय संघाने तब्बल १८१ चेंडू निर्धाव खेळले होते.. याचा मोठा परिणाम धावसंख्यावर झाला. यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना केवळ २०१ धावाच करता आल्या. इंग्लंडने सहजपणे हे लक्ष्य पार करताना केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात विजय मिळवला. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाला आपल्या अनेक कमजोरी दूर कराव्या लागणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात अनेक बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांच्यानुसार, संघातील अनेक खेळाडू मधल्या फळीत संघाचा डाव सावरण्यास सक्षम आहेत. अशा परिस्थितीत युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जला तिसऱ्या स्थानावर खेळविण्यात येऊ शकेल. विशेष म्हणजे, २०१७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ केवळ तीनवेळाच २५० हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे संघाची फलंदाजी चिंतेचा विषय ठरत आहे.  कसोटी सामन्यात प्रभावी पदार्पण करणारी स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांचा अष्टपैलू म्हणून संघात समावेश होऊ शकतो. दुसरीकडे, इंग्लंड जबरदस्त फॉर्ममध्ये असून ते आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.

प्रतिस्पर्धी संघ :n भारत : मिताली राज (कर्णधार), स्मती मानधना, शेफाली वर्मा, पूनम राऊत, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, स्रेह राणा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिग्स, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, एकता बिष्ट, राधा यादव, पूनम यादव, प्रिया पूनिया आणि इंद्राणी रॉय. 

n इंग्लंड : हीथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, केट क्रॉस, नॅट साइवर, सोफिया डंकले, लॉरेन विनफील्ड-हिल, अन्या श्रुबसोल, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, एमी जोन्स, फ्रेया डेविस, टॅश फारंट, सराह ग्लेन, मैडी विलियर्स, फ्रैन विल्सन, सारा ग्लेन आणि एमिली अरलॉट.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघइंग्लंड