Join us

आज सामना, भारतापुढे इंग्लंडविरुद्ध चुका टाळण्याचे आव्हान

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडवर विजय नोंदविल्यास हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बाद फेरीत धडक देईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 06:00 IST

Open in App

गेकबेर्हा (द. आफ्रिका) : पहिल्या दोन्ही सामन्यांत दडपणाच्या स्थितीचा सामना करणारा भारतीय संघ शनिवारी महिला टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध खेळणार असून विजयासाठी चुका टाळण्याचे आव्हान संघापुढे असेल.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडवर विजय नोंदविल्यास हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बाद फेरीत धडक देईल. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.  भारताने सलामीला पाकिस्तानचा सात गडी राखून आणि त्यानंतर वेस्ट इंडीजचा सहा गडी राखून पराभव केला होता.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमहिला
Open in App