टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'अ' गटातील नामिबियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात शंभरहून अधिक धावांनी मोठा विजय नोंदवत पाकिस्तानच्या संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी, २१ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या सुपर ८ च्या फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझींडविरुद्ध नियोजित आहे. नामिबियाविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानी कर्णधार टीम इंडियाविरुद्ध झिरो ठरलेल्या शतकवीर साहिबजादा आणि संघातील अन्य खेळाडूंवर स्तुती सुमनांचा वर्षाव करताना दिसतोय. दुसरीकडे साखळी फेरीतील पाकिस्तानच्या संघाने मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटर आणि टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कॉमेंट्री पॅनलचा भाग असलेल्या इरफान पठाणने पाकिस्तानला टोमणा मारला आहे. इरफान पठाण याने पाकिस्तानसंदर्भात केलेले वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
इरफान पठाणचा पाकिस्तानला टोला
पाकिस्तान-नामिबिया यांच्यातील लढतीनंतर स्टार स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंगच्या खास शोमध्ये मयंती लँगर आणि इरफान पठाण या दोघांनी मिळून पाकिस्तान संघाची मजा घेतल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानचा संघ हा लोअर रँकिंग संघाविरुद्धच दमदार कामगिरी करतो, असा टोला इरफान पठाण याने हाणला. यावेळी मयंतीने हसत हसत कोलंबोच्या मैदानातील भारत-पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्याचा उल्लेखही यावेळी केल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
VIDEO: पाकिस्तानी कोच-कॅप्टनमध्ये तुफान राडा; हेसनने रागात सुनावलं, सलमानने बाटलीच फेकली...
"सरड्याची धाव कुंपणापर्यंत ...." ते दुबळ्या संघासमोर ताकद दाखवतात!
छोट्या संघाविरुद्ध खेळताना पाकिस्तानचा आत्मविश्वात कमालीचा उंचावलेला असतो. ते लिंबू टिंब संघासमोर आक्रमक होतात. दुबळ्या संघासमोरच त्यांची ताकद दिसते. नामिबियाविरुद्ध तेच झाले, असे सांगत इरफान पठाण याने "सरड्याची धाव कुंपणापर्यंत..." या धाटणीत पाकिस्तानी संघाला ट्रोल केले आहे.
सुपर ८ मध्ये खरी कसोटी
कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानच्या संघाने २००९ मध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे. पण भारताविरुद्ध फक्त ते एकदाच जिंकले आहेत. एवढेच नाहीतर या स्पर्धेत पाकिस्तान संघाला गतवर्षी अमेरिकनं तर त्याच्या आधी झिम्बाब्वेनं बाहेर काढल्याचेही पाहायला मिळाले होते. साखळी फेरीत तरल्यानंतर त्यांच्यासमोर आता सुपर ८ मध्ये तगड्या संघांचे आव्हान असेल. इरफान पठाण म्हटल्याप्रमाणे इथं ते फुसका बार ठरणार की, धमक दाखवणार? ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : After Pakistan's win against Namibia, Irfan Pathan mocked the team, saying they perform well only against weaker opponents. He alluded to their struggles against stronger teams and in past tournaments, suggesting their true test lies ahead in the Super 8 stage.
Web Summary : नामीबिया के खिलाफ पाकिस्तान की जीत के बाद, इरफान पठान ने टीम का मजाक उड़ाते हुए कहा कि वे केवल कमजोर विरोधियों के खिलाफ ही अच्छा प्रदर्शन करते हैं। उन्होंने मजबूत टीमों के खिलाफ उनके संघर्षों का उल्लेख किया और सुझाव दिया कि सुपर 8 चरण में उनकी असली परीक्षा होगी।