राजस्थान : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निलंबित केले. त्यानंतर हार्दिककडे ब्रँड्सनेही पाठ फिरवली आणि खार जिमखानाने त्याचे मानद सदस्यत्व रद्द केले. या प्रकरणावरील सुनावणी न्यायालयात प्रलंबित आहे आणि 19 फेब्रुवारीला त्यावर निकाल अपेक्षित आहे. तोपर्यंत या दोघांवरील बंदी हटवण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या भारतीय संघाकडून न्यूझीलंड दौऱ्यात खेळत आहे, तर राहुल भारत A संघाकडून स्थानिक सामना खेळला. पण, कॉफी विथ करणचं भूत त्यांच्या मानगुटीवर कायम आहे. जोधपूरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.या दोघांबरोबर कार्यक्रमातील सुत्रसंचालक करण जोहरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोधपूरमधील सरेचा गावातील देवाराम मेघवाल यांनी लूनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पांड्या, राहुल यांच्या मानगुटीवरील 'कॉफी विथ करण'चं भूत, जोधपूरमध्ये गुन्हा दाखल
पांड्या, राहुल यांच्या मानगुटीवरील 'कॉफी विथ करण'चं भूत, जोधपूरमध्ये गुन्हा दाखल
हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर कॉफी विथ करणचं भूत कायम आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 10:31 IST