Join us

विंडीजचे खेळाडू भर मैदानावर एकमेकांच्या अंगावर धावले, पाहा व्हिडीओ

कॅरेबिनयन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी वेस्ट इंडिजचे खेळाडू भर मैदानावर एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला. ट्रीनबागो नाइट रायडर्स आणि ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 09:45 IST

Open in App

कॅरेबिनयन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी वेस्ट इंडिजचे खेळाडू भर मैदानावर एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला. ट्रीनबागो नाइट रायडर्स आणि सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स यांच्यातील सामन्यात हा प्रकार घडला. पॅट्रीओट्सचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट आणि रायडर्सचा सलामीवीर लेंडल सिमन्स यांच्यात ही बाचाबाची झाली. त्यामुळे सामन्यात तणाव निर्माण झाला होता.

सामन्याच्या 8 व्या षटकात जेव्हा सिमन्स आणि दिनेश रामदिन फलंदाजी करत होते, तेव्हा हे घडले. फॅबीयन अॅलेनच्या गोलंदाजीवर रामदीनने फटका मारला आणि एक धाव पूर्ण केली. धाव पूर्ण केल्यानंतर रामदिन व सिमन्स खेळपट्टीच्या मध्यभागी आले आणि त्यावेळी ब्रेथवेटने बेल्स पाडून धावबादची अपील केली. पंचांनी त्वरित त्याचे अपील फेटाळून लावले, परंतु ब्रेथवेट व सिमन्स यांच्यात वाद झाला. पंचांनी धाव घेत या दोघांना आवरले. 

पाहा व्हिडीओ.. पॅट्रीओट्सने  प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 125 धावा केल्या. लॉरी इव्हानसने 47 चेंडूंत 55 धावा केल्या. रायडर्सच्या ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याला सुनील नरीन आणि अली खान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रायडर्सकडून सिमन्सने 51 धावा केल्या. त्याला रामदीन ( 32*) आणि किरॉन पोलार्ड ( 26*) यांनी दमदार साथ दिली.  

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगवेस्ट इंडिज