India Star Batsman Abhishek Sharma Named ICC Player Of The Month : आशिया कप स्पर्धा गाजवणाऱ्या भारताच्या युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा विजेता ठरला आहे. सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या आयसीसीच्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मासोबत भारताचा कुलदीप यादव आणि झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट यांना नामांकन मिळाले होते. या दोघांना मागे टाकत अभिषेकनं बाजी मारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिया कप स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर कार जिंकली, टी-२० ऑल टाइम रँकिंगमध्ये रेकॉर्ड सेट केला, आता...
अभिषेक शर्मानं आक्रमक अंदाजातील फटकेबाजीसह अल्पावधित भारतीय संघात आपली खास छाप सोडली आहे. टी-२० संघाचा तो पर्मनंट ओपनर झाला आहे. आशिया कप स्पर्धेत त्याने ३ अर्धशतकासह २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटसह धावा करत ३१४ धावा कुटल्या. या कामगिरीच्या जोरावर तो सामनावीरचा मानकरी ठरला. त्याला अलिशान कारही मिळाली. एवढेच नाही तर आयसीसीच्या टी-२० रँकिंगमध्ये ऑलटाइम सर्वोच्च रेटिंगचा नवा विक्रमही त्याने प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. आता त्याची पोचपावती म्हणून त्याला आयसीसीकडून महिन्याला देण्यात येणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पहिल्यांदाच तो या पुरस्काराचा विजेता ठरला आहे.
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
पहिल्यांदा आयसीसी पुरस्कार मिळाल्यावर काय म्हणाला अभिषेक?
आयसीसीचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. ज्या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला ती कामगिरी भारतीय संघाला जेतेपद मिळवून देणारी होती, त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी अधिक खास वाटतो. टीम इंडियाचा भाग असणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. संघातील उत्तम वातावरण आणि सकारात्मक मानसिकतेच्या जोरावर भारतीय संघ टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी करण्यात यशस्वी ठरत आहे, ही गोष्टही त्याने बोलून दाखवली आहे.