Video: इंग्लंडच्या बेन स्टोक्सची दादागिरी कॅमे-यात कैद, युवकाला धो-धो धुतलं

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सोमवारी ब्रिस्टॉलमध्ये अटक करण्यात आली होती. या 26 वर्षीय इंग्लिश क्रिकेटपटूला संपूर्ण रात्र तुरुंगात काढावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 07:33 PM2017-09-28T19:33:50+5:302017-09-28T19:37:25+5:30

whatsapp join usJoin us
Capture of Ben Stokes in England, in captivity, in captivity; | Video: इंग्लंडच्या बेन स्टोक्सची दादागिरी कॅमे-यात कैद, युवकाला धो-धो धुतलं

Video: इंग्लंडच्या बेन स्टोक्सची दादागिरी कॅमे-यात कैद, युवकाला धो-धो धुतलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सोमवारी ब्रिस्टॉलमध्ये अटक करण्यात आली होती. या 26 वर्षीय इंग्लिश क्रिकेटपटूला संपूर्ण रात्र तुरुंगात काढावी लागली. दुस-या दिवशी सकाळी कुठल्याही आरोपाविना त्याची सुटका करण्यात आली. ब्रिस्टॉलच्या एका नाईटक्लबमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी स्टोक्सला अटक करण्यात आली होती. ही घटना घडली त्यावेळी स्टोक्ससह त्याचा संघातील सहकारी अॅलेक्स हेल्सही तिथे उपस्थित होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज  ‘सन न्यूज’ने जारी केले आहे. त्यामध्ये एका युवकाला स्टोक्स जबरदस्त मारहाण करताना दिसत आहे.

स्टोक्स आणि हेल्स या दोघांनाही संघातून निलंबित करण्यात आल्याने  त्यांना बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात खेळता आलं नाही. रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धची तिसरी वनडे जिंकल्यानंतर स्टोक्स आणि हेल्स दोघे नाईटक्लबमध्ये गेले होते त्यावेळी ही घटना घडली असे वृत्त बीबीसीने दिले आहे. 

या हाणामारीत स्टोक्सच्या हातालाही मार लागला. चौथ्या वनडेपूर्वी ओव्हलवर झालेल्या सरावाला स्टोक्स आणि अॅलेक्स दोघेही गैरहजर होते. पोलीस तपासासाठी हेल्स पुन्हा ब्रिस्टॉलला गेला होता. मी बेनला भेटायला ब्रिस्टॉलला गेलो होतो. आम्ही सुद्धा या प्रकरणाची चौकशी करु. ठरल्याप्रमाणे अॅशेस मालिकेसाठी संघाची निवड होईल असे इंग्लंडचे क्रिकेट संचालक अँण्ड्रयू स्ट्रॉस यांनी सांगितले.  

पाहा व्हिडीओ -

(फोटो आणि व्हिडीओ -  ‘सन न्यूज’)

 

Web Title: Capture of Ben Stokes in England, in captivity, in captivity;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.