Join us

India vs England: इंग्लंडच्या दिग्गज 'कॅप्टन मूर' यांचा कोरोनानं मृत्यू; चेन्नई कसोटीवरही शोककळा

Captain Sir Tom Moore : इंग्लंडच्या लष्करातील माजी कॅप्टन सर टॉम मूर टॉम मूर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 13:49 IST

Open in App

भारत विरुद्ध इंग्लंड  (India vs England) कसोटी मालिकेला चेन्नईत (Chennai Test)  सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण इंग्लंडच्या सलामीवीरांनी जेव्हा मैदानात पाऊल ठेवलं तेव्हा फलंदाजांनी त्यांच्या हातावर बांधलेल्या काळ्या पट्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

इंग्लंडच्या लष्करातील माजी कॅप्टन सर टॉम मूर टॉम मूर (Captain Sir Thomas Moore) यांचं कोरोना व्हायरसमुळे निधन झालं. मूर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली आहे. मूर यांच्या निधानाच्या बातमीने संपूर्ण इंग्लंडवर शोककळा पसरली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटनंही दु:ख व्यक्त केलं. 

"कॅप्टन मूर यांच्या लढवय्या कामगिरीचा सर्वांना अभिमान आहे. देश जेव्हा अंध:कारात झगडत होता. तेव्हा त्यांनी देशाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी प्रयत्न केला. मी संपूर्ण इंग्लंड संघाकडून त्यांच्या प्रति अतिशय आदर व्यक्त करतो आणि मूर यांच्या कुटुंबियांता दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. कॅप्टन मूर नेहमी आठवणीत राहतील", असं जो रुटनं म्हटलं आहे. 

तीन अब्ज रुपये जमा केलेदुसऱ्या महायुद्धातील वेटरन कॅप्टन मूर यांना कोरोनाची बाधा झाली होती. यातच त्यांचं निधन झालं. मूर यांच्या कुटुंबियांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनाची बातमी दिली. कॅप्टन मूर यांनी कोरोनाकाळात तब्बल ४० मिलियन डॉलरचा निधी जमा करुन नॅशनल हेल्थ सर्व्हीससाठी मोठं योगदान दिलं होतं. ही रक्कम जवळपास ३ अब्ज इतकी आहे. दुसऱ्या महायुद्धावेळी कॅप्टन मूर यांनी भारत आणि बर्मामध्ये ब्रिटीश लष्कराकडून काम पाहिलं आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटभारतीय क्रिकेट संघ