MS Dhoni Captain Cool Trademark Controversy : भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिह धोनी याने 'कॅप्टन कूल' हा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी रितसर अर्ज केला आहे. आपल्या शांत स्वभावाने MS धोनीनं क्रिकेटच्या मैदानात 'कॅप्टन कूल' नावाने ओळख मिळवली असल्यामुळे हा ट्रेडमार्क अगदी सहज त्याचा होईल, असे वाटत होते. पण आता यात एक नवे ट्विस्ट आले आहे. लॉ फर्म के.एनालिसिस अॅटर्नीज अॅट लॉ ने MS धोनीच्या अर्जात अनेक प्रक्रियात्मक त्रुटी, पूर्वी वापराचा पुरावा नसणे आणि या शब्दाचे सामान्य स्वरूप या गोष्टींचा दाखला देत अर्जावर आक्षेप घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्ससाठी वापरण्यात आलाय 'कॅप्टन कूल' शब्द
'कॅप्टन कूल' हा सामान्य वापरातील शब्द आहे. याआधीही काही खेळाडूंसाठी हा शब्दप्रयोग करण्यात आलाय. त्यामुळे MS धोनीला या शब्दांवर हक्क सांगता येणार नाही, असा दावा दिल्लीतील रहिवाशी असलेले वकील आषुतोष चौधरी यांनी केला आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगासह अन्य क्रिकेटर्सच्या बाबतीत या शब्दाचा वापर करण्यात आला होता. यासंदर्भातील जुन्या वृत्तपत्रातील लेख आणि क्रिकेट कव्हरेज या गोष्टी पुराव्याच्या रुपात सादर करण्यात आल्याचे समजते.
SENA देशांत टीम इंडिया नंबर वन! इंग्लंडच्या खांद्यावरून साधला पाकवर निशाणा
अर्ज मंजूर झाला, पण आता त्यात अडथळा
धोनीनं कॅप्टन कूल ट्रेडमार्क मिळवण्यासंदर्भातील अर्ज मूळतः जून २०२३ मध्ये दाखल केला होता. हा अर्ज जून २०२५ मध्ये ट्रेडमार्क रजिस्ट्रीच्या कोलकाता कार्यालयाने स्वीकारला. त्यानंतर १६ जून २०२५ रोजी अधिकृतरित्या हा अर्ज ट्रेडमार्क जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. प्रोटोकॉलनुसार, कोणत्याही पक्षाला विरोध करायचा असेल तर तो प्रकाशित झाल्यापासून १२० दिवसांच्या आत करावा लागतो. धोनीच्या या अर्जावर आक्षेप नसता तर १२० दिवसांनी या नावावर त्याची मालकी झाली असती. पण आता हे प्रकरण १९९९ च्या ट्रेडमार्क कायद्यातील, कलम २१ नुसार, विचारात घेतले जाईल.
सचिन-द्रविडचाही दिला दाखला
'कॅप्टन कूल' हा वाक्यप्रचार क्रीडा क्षेत्रात सामान्य आहे, यावर जोर देताना वकिलाने राहुल द्रविडसाठी वापरण्यात येणारा 'द वॉल' आणि सचिन तेंडुलकरसाठी वापल्या जाणाऱ्या 'गॉड ऑफ क्रिकेट' या शब्दप्रयोगाचाही दाखलाही दिला आहे. ट्रेडमार्क कायद्यानुसार, या शब्दांवर एका व्यक्तीला अधिकार सांगता येणार नाही, असे म्हटले आहे.